भीषण अपघातात बसचा चक्काचूर; १ ठार, २१ जखमी.

जळगावात बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता, की बसचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. जिल्ह्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. दररोज अपघात सुरू असून यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. असाच एक भीषण अपघात घडला आहे. ट्रॅक्टर आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २१ प्रवासी जखमी झाले आहे. अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झालेला आहे.
 काही दिवसांपूर्वी धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे बस अपघात होऊन २८ प्रवासी जखमी झाल्याची झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा सकाळी धरणगाव चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे फाट्याजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार आणि २१ प्रवासी जखमी झाल्याचं समोर येत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०) ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर बसमधली २१ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील बसचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान या भीषण अपघातात जखमी झालेल्या २१ प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण पवन देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काश रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. यासंदर्भात अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतली आहे. जाकीर शब्बीर खाटीक (वय -३५, रा. पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (वय-६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय -६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय-५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय-३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय -२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय-७५, रा. पिंपळे सिम), जयश्री गणेश मराठे वय-४५, शरद बिलाडिया पारधी (वय-४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय-६५, नळयात), रमेश सोनू मराठी वय-७५, कमलबाई काशिनाथ मराठे (वय-७५), वरुड प्रवीण भगवान कुंभार (वय-२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय-३८, साळवा), सुषमा कपिल सिंग बयास (वय -३६, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (वय -७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय-३६, धरणगाव), सुनील रामसिंग अलकारी (वय -५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय-५२, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (वय-३३, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (वय-४०, जळगाव) असे प्रवासी जखमी झालेले आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.