सख्ख्या भावांकडून आईची हत्या, नंतर अंत्यसंस्काराची तयारी, तेवढ्यात शेजारच्यांना संशय आणि..

दोन सख्ख्या भावांनी मिळून त्यांच्या आईला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांनी आईचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचला, पण शेजारच्यांमुळे हा बनाव फसला. हत्येच्या अनेक घटना समोर येत असतात. पण दोन मुलांनीच सख्ख्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन भावांनी मिळून आधी आईला संपवलं. नंतर नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचून अंत्यसंस्काराची तयारी केली. पण शेजारच्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि यानंतर जो खुलासा झाला तो हैराण करणारा आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही सख्ख्या भावांना आपल्या आईला आपल्यासोबत ठेवायचं नव्हतं. दोघांनाही वृद्ध आईची सेवा करायची नव्हती. त्यामुळेच दोघांनी आईसोबत भयंकर कृत्य करण्याची योजना आखली. दोघांनी मिळून आपल्या आईची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आईचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला हे दाखवून दिलं. नंतर आईच्या अंत्यसंस्काराची तयारीही केली. पण तेवढ्यात त्यांच्या शेजारच्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आणि अंत्यसंस्कार थांबवण्यात आले.पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवून वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात महिलेच्या निधनाचं खरं कारण समोर आलं. ही धक्कादायक घटना ग्वालियर येथील राय कॉलनीमध्ये घडली आहे.

८८ वर्षीय वृद्ध महिला कमला कोष्ठा या आपल्या दोन मुलांसोबत डालचंद आणि प्रेमनारायण कोष्ठासोबत एकाच घरात राहत होत्या. ९ डिसेंबरच्या रात्री कमला यांचा मृत्यू झाला. दोन्ही भावांनी आईचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं सर्वांना भासवलं. त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी झाली, पण शेजारच्यांना मृतदेहाच्या गळ्यावर बोटांचे निशाण दिसले. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांत दिली. पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवला. चार दिवसांनी आलेल्या अहवालात महिलेचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचं समोर आलं. दोन्ही भावांनी आधी मद्यपान करुन नंतर नशेत आईची गळा दाबून हत्या केली. अहवालात महिलेच्या गळ्याचं हाड तुटल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चौकशीदरम्यान त्यांनी आईची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. तसंच दोघांनाही आईची सेवा करायची नव्हती, यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केलं असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.