दोन महिन्यांपूर्वी कुत्रा चावला, नंतर मांजरीचा दंश; कल्याणच्या तरुणाची एक हलगर्जी, आयुष्यालाच मुकला.

कल्याणमध्ये आधी कुत्रा आणि नंतर मांजर चावल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणाची एक चूक त्याच्या जीवावर बेतली आहे. कुत्रा चावल्यानंतर तातडीने उपचार घेणं आवश्यक असतं. कुत्रा चावल्यानंतर काही वेळात रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावर बेतू शकतं. अशीच एक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कल्याणमधील एका तरुणाला आधी भटका कुत्रा चावला आणि नंतर मांजर चावली. पहिल्यांदा कुत्रा चावल्यानंतर आणि दुसऱ्या वेळी मांजर चावल्यावरही तरुणाने दुर्लक्ष केलं. हेच त्याच्या जीवावर बेतलं आहे.

कल्याणमध्ये कुत्रा चावलेल्या तरुणाचं नाव शुभम चौधरी असं होतं. २७ वर्षीय शुभम त्याच्या कुटुंबीयांसह कल्याण पश्चिमेत राहात होता. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो नोकरीच्या शोधात होता. शुभम दोन महिन्यांपूर्वी रात्री फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी एका भटक्या कुत्र्याने शुभमला चावा घेतला. हा चावा किरकोळ असल्याचं समजून शुभमने कुत्रा चावल्यानंतर कोणतेही उपचार घेतले नाहीत. त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याला एका मांजरीने चावा घेतला. तो चावाही किरकोळ असल्याने त्याने उपचार केले नाहीत. कल्याणच्या गोल्डन पार्क परिसरातील ही घटना आहे.दरम्यान १० डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील दोन खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला गेला. त्यानंतर कळवा रुग्णालयातून त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना १२ डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाला.           कल्याणमध्ये कुत्रा आणि मांजरींचा सुळसुळाट झाला आहे. माझा मुलगा अडीच ते तीन महिन्यांपूर्वी रात्री फेरफटका मारत असताना त्याला कुत्रा चावला. तो कुत्रा पिसाळलेला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी माझ्या मुलाला मांजर चावली, आधी डॉग बाईट आणि नंतर कॅट बाईटने माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया शुभम चौधरी याच्या वडिलांनी दिली आहे. दरम्यान राज्यातील सर्वच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने कुत्रे आणि मांजरी यांच्या लसीकरण आणि निरबिजिकरणाकडे लक्ष घातलं पाहिजे, भटक्या कुत्रा, मांजरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.