घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यातील उल्लेखानुसार ईडी अधिकारी परमार दाम्पत्याला म्हणाले की ‘इतकी कलमं लावेन, की राहुल गांधी पंतप्रधान झाले, तरी ती हटवू शकणार नाहीत’ काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्याय यात्रेच्या वेळी आपली पिगी बँक भेट देणाऱ्या चिमुकल्यांच्या आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज आणि नेहा परमार असे मृत जोडप्याचे नाव आहे. मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील राहत्या घरी दाम्पत्याचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. ईडीच्या नोटिशीनंतर अधिकाऱ्यांनी केलेल्या धाकदपटशामुळे दोघांनी जीवनयात्रा संपवल्याचा आरोप आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यातील उल्लेखानुसार ईडी अधिकारी परमार दाम्पत्याला म्हणाले की ‘इतकी कलमं लावेन, की राहुल गांधी पंतप्रधान झाले, तरी ती हटवू शकणार नाहीत’










