वाघाला ग्रामस्थांनी अक्षरश: घेराव घालून त्याच्यासोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या संदर्भात एबीपी माझा नं बातमी दाखवताचं आता वन विभाग ॲक्शन मोडवर आलं आहे. BT-10 या वाघिणीचा 19 वर्षीय बछडा आईपासून दुरावलेला असून हा वाघ स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी नवीन जंगलाच्या शोधासाठी भटकंती करीत आहे. अशात अड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतूर्ली गावालगत वाघानं शिकार केल्यानंतर सुस्तावलेला वाघ झुडपात बसला होता. यावेळी शेकडोंच्या संख्येत ग्रामस्थांनी त्याला अक्षरश: घेराव घालून त्याच्यासोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या संदर्भात एबीपी माझा नं बातमी दाखवताचं आता वन विभाग ॲक्शन मोडवर आलं आहे.










