नवरा गाढ झोपेत, तिने वर्षभराच्या लेकराला उचललं अन् पाण्याच्या टाकीत टाकलं,

 एका महिलेने आपल्या वर्षभराच्या मुलाला पाण्याच्या टाकीत टाकून त्याचा जीव घेतला. सासू सुनेच्या भांडणात या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. सासू, सुनेच्या भांडणात अवघ्या १ वर्षीय बालकाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना येथील शहापूर तालुक्यातील कासणे गावात घडली आहे. घरगुती भांडणातून जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाला पाण्याने भरलेल्या टाकीत बुडवून ठार मारल्याने आई अपेक्षा भोई (वय २२) हिच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आईला अटक केली आहे. पार्थ असे हत्या झालेल्या बाळाचे नाव आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासणे गावात भोई यांचे कुटुंब राहते. संदेश यांचा विवाह २०२२ मध्ये अपेक्षा हिच्याशी झाला होता आणि आरोपी अपेक्षा आणि संदेश या दाम्पत्याला वर्षभरापूर्वी पार्थ झाला होता. परंतु त्याला जन्मतःच ह्रदयविकार असल्याने त्याच्यावर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरु होते. आजारी मुलगा जन्माला घातला यावरुन अपेक्षा आणि तिच्या सासू यांच्यात नेहमीच खटके उडत होते. तर, दुसरीकडे मृत मुलगा मीच सांभाळ करून या मुलावर माझाही हक्क असल्यानं सासू सुनेत नेहमीच घरात वाद होत होते.

त्यातच आरोपी अपेक्षाची सासू मंगळवारी पार्थ याला घेऊन टिटवाळा येथे नंदेकडे गेली होती. तेथील हवामान आजारी पार्थला काही मानवले नाही. बदललेल्या हवामानामुळे त्याला ताप आला. म्हणून सासू पार्थला घेऊन पुन्हा मंगळवारी रात्री घरी कासणे गावी आली. पार्थची प्रकृती बिघडल्याने अपेक्षा आणि सासूमध्ये रात्री जोरदार भांडण झाले. हे भांडण मिटवून संदेश कामावर गेला होता. त्यानंतर बुधवार पहाटे रात्रपाळीवरुन संदेश घरी आला मुलासोबत खेळता खेळता गाढ झोपला असतानाच आई अपेक्षाने सर्वांची नजर चुकवून पहाटेच्या सुमारास घराच्या पहिल्या माळ्यावर ५ हजार लिटर पाण्याने भरलेल्या टाकीत पार्थला बुडवून त्याची हत्या केली दरम्यान, नंतर मृत मुलाचे वडील संदेश यांनी आपला पार्थ दिसत नसल्याचं सांगितलं, त्यानंतर कुटुंबासह मित्रांनी त्याचा शोध घेतला. तर, दुसरीकडे पार्थ हरवल्याचा कांगावा आरोपी आईने केला. मात्र, पती संदेशला पत्नीवर ती कांगावा करून खोटा बोलत असल्याचा संशय आला आणि पती संदेशने तिची अधिक चौकशी केली असता, तिने मुलाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याचं सांगितलं. त्यानंतर संदेश भोई यांच्या फिर्यादीवरून पडघा पोलिसांनी अपेक्षाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.