सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे झाला असून या अपघातामध्ये दोन जनांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खलबळ माजली आहे. तर, यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुक संध गतीने होत होती.सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा खारेपाटण येथे महामार्गावर दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत राजापूर येथील दोघे तरुण जागीच ठार झाले आहेत. ही घटना काल (बुधवार ११ डिसेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर घडल्याची माहिती आहे. या घटनेत सचिन एकनाथ लाड (रा. हसोळ राजापूर, वय ३६) हा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला तानाजी वामन शेळकर (वय ३०, रा. कोडवशी राजापूर शिखरवाडी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.










