भाडेतत्त्वावर काम करणाऱ्या बस चालकाला मिनीबसच्या अनुभवानंतर अत्यंत तुटपुंज्या अनुभवावर मोठ्या बसचे स्टिअरिंग हाती सोपवण्यात आले होते. भीषण अपघातामुळे हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. कुर्ला येथील गजबजलेल्या भागात बेदरकारपणे बस घुसवणाऱ्या चालकाला इलेक्ट्रिकवरच्या १२ मीटर लांबीच्या बसगाडीवर अवघे तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन रुजू केले होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ‘बेस्ट’च्या नियमित बस चालकांना दीड महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यानंतरच कर्तव्यावर रुजू करून घेतले जात असताना भाडेतत्त्वावर काम करणाऱ्या बस चालकाला मिनीबसच्या अनुभवानंतर अत्यंत तुटपुंज्या अनुभवावर मोठ्या बसचे स्टिअरिंग हाती सोपवण्यात आले होते. भीषण अपघातामुळे हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. अशातच आरोपी बस चालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्याने गोंधळल्याचा दावा आरोपी बस चालकाने केला आहे. क्लच समजून चुकून अॅक्सलरेटर दाबल्याचं त्याने जबाबात म्हटल्याची माहिती आहे. तांत्रिक तपासणीत बसचे ब्रेक काम करत असल्याचंही निष्पन्न झालं आहे.










