ऑटोमॅटिक गाडीची सवय नव्हती आणि नेमका… कुर्ला बस अपघातातील आरोपी चालकाचा धक्कादायक जबाब.

भाडेतत्त्वावर काम करणाऱ्या बस चालकाला मिनीबसच्या अनुभवानंतर अत्यंत तुटपुंज्या अनुभवावर मोठ्या बसचे स्टिअरिंग हाती सोपवण्यात आले होते. भीषण अपघातामुळे हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे.  कुर्ला येथील गजबजलेल्या भागात बेदरकारपणे बस घुसवणाऱ्या चालकाला इलेक्ट्रिकवरच्या १२ मीटर लांबीच्या बसगाडीवर अवघे तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन रुजू केले होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ‘बेस्ट’च्या नियमित बस चालकांना दीड महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यानंतरच कर्तव्यावर रुजू करून घेतले जात असताना भाडेतत्त्वावर काम करणाऱ्या बस चालकाला मिनीबसच्या अनुभवानंतर अत्यंत तुटपुंज्या अनुभवावर मोठ्या बसचे स्टिअरिंग हाती सोपवण्यात आले होते. भीषण अपघातामुळे हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. अशातच आरोपी बस चालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्याने गोंधळल्याचा दावा आरोपी बस चालकाने केला आहे. क्लच समजून चुकून अॅक्सलरेटर दाबल्याचं त्याने जबाबात म्हटल्याची माहिती आहे. तांत्रिक तपासणीत बसचे ब्रेक काम करत असल्याचंही निष्पन्न झालं आहे.

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ‘बेस्ट’ बसमार्ग क्रमांक ए ३३२ ही बस कुर्ला बस स्थानक पश्चिम येथून अंधेरी बस स्थानक पूर्वेकडे निघाली. मात्र, बस स्थानकातून सुटताच या बेफाम बसने ३० ते ४० वाहनांसह पादचाऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातातील मृतांची संख्या ७ झाली असून, ४२ जण जखमी झाले.ही बस या मार्गावर नियमितपणे चालवली जाते. चालकाला ‘बेस्ट’ उपक्रमाकडून आणि पुरवठादार कंपनीकडूनही प्रशिक्षण दिले असतानाही दुर्घटना घडल्याने याबाबत तपास केला जाणार असल्याचे ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी सांगितले. चालकाचे नियंत्रण सुटले की त्यामागे अन्य कारणे आहेत, याचाही तपास ‘बेस्ट’कडून होणार असल्याचे ते म्हणाले.

या अपघातानंतर बस चालक संजय मोरे याचा चालक म्हणून अनुभव व प्रशिक्षणाचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. ‘बेस्ट’च्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बसवरील चालकांची भरती, त्यांना दिले जाणारे प्रशिक्षणच वादात अडकले आहे. मिनीबस चालवण्याचा अनुभव असलेल्या चालक मोरे याला अपघातग्रस्त १२ मीटर लांबीची इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण केवळ तीन दिवसांतच देऊन १ डिसेंबरपासून नियुक्त करण्यात आले होते. ‘बेस्ट’च्या नियमित चालकांना दीड महिन्याचे प्रशिक्षण दिल्यानंतरच कर्तव्यावर रूजू केले जाते. मग, भाडेतत्वावरील बसवरील चालकांसाठी वेगळा नियम का, असा प्रश्न उपस्थित होत आहे

  • Related Posts

    जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.

    जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो…

    भर चौकात घेत होता गर्लफ्रेंडचा प्राण, रस्त्यावर लोळवून तोडत होता मान, पण तेवढ्यात…धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.

    एक बॉयफ्रेंड भर रस्त्यात सगळ्यांसमोर आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं या मुलीला रस्त्यावर लोळवलं आणि तिची मान तोडत होता. पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही देखील शॉक्ड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.

    जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी  गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार   – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.

    भर चौकात घेत होता गर्लफ्रेंडचा प्राण, रस्त्यावर लोळवून तोडत होता मान, पण तेवढ्यात…धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.

    भर चौकात घेत होता गर्लफ्रेंडचा प्राण, रस्त्यावर लोळवून तोडत होता मान, पण तेवढ्यात…धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.

    चीनमधील HMPV विषाणूची भारतात पहिली केस, 8 महिन्यांच्या मुलीला झाला संसर्ग जाणून घ्याल .

    चीनमधील HMPV विषाणूची भारतात पहिली केस, 8 महिन्यांच्या मुलीला झाला संसर्ग जाणून घ्याल .

    खंडणी प्रकरणाचा गेम फिरला? पुण्यातील कुख्यात गुंड घायवळसोबत धसांचे संबंध, बिक्कडने फोडला मोठा बॉम्ब.

    खंडणी प्रकरणाचा गेम फिरला? पुण्यातील कुख्यात गुंड घायवळसोबत धसांचे संबंध, बिक्कडने फोडला मोठा बॉम्ब.