रिल्स स्टारचा भलताच कारनामा, दोन महिलांना तसल्या कामात अडकवणार होती.

साताऱ्यात दोन महिलांना वेश्या व्यवसायात फसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका रिल्स स्टारसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सापळ रचत या लोकांना अटक केली. समाजमाध्यमांवर रिल्स स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका महिलेसह तिच्या तीन साथीदारांनी वेश्या व्यवसायासासाठी दोन महिलांना प्रवृत्त केले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी उघडकीस आणली. याप्रकरणी सातारा पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. गणेश मनोहर भोसले (रा. कोरेगाव), ईश्वर सुभाष जाधव (रा. विलासपूर), वीरेंद्र महेंद्र जाधव (रा. सदरबझार) आणि रिल्स स्टार महिलेविरोधात वेश्या व्यवसायअंतर्गत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी सांगितले की, सोनगावच्या हद्दीमधील खिंडवाडी ते सोनगावला जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर मानवी अनैतिक व्यापार (वेश्या व्यवसाय) सुरू असल्याची माहिती खबरीद्वारे पोलिसांना मिळाली. वेश्या पुरवण्यासाठी महिला, मुली उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकामार्फत संबंधित टोळीतील महिलेला फोन लावला.

वेश्या आणि पैशांसंदर्भात बोलणं झाल्यानंतर त्यांनी सोनगाव रस्त्यावर पार्टीला बोलावले. त्यानुसार, दुचाकीवरून सर्व संशयित दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत पोहोचले सोनगाव रस्त्यावर पोहोचले. यावेळी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. ही संशयित टोळी संगनमत करून दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी या संशयितांची प्राथमिक माहिती घेतली असता ही संशयित महिला समाजमाध्यमांवर रिल्स स्टार असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी घटनास्थळी छापा मारल्यानंतर पंचनामा केला असता संशयितांकडून रोख रकमेसह मोबाईल, फोन, दोन दुचाकी असा २ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, फौजदार श्वेता पाटील, पोलिस मोना निकम, पंकजा जाधव, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, क्रांती निकम यांनी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.