सरपंच गावाचाच लागतो म्हणून आमदारही गावाचाच हवा-भोजमल पाटील
विकासपुरुष भूमिपुत्र अनिल पाटील विजयी करण्याचे केले आवाहनअमळनेर-ग्रामिण भागात गाव गाड्याचा कारभार करताना सरपंच आपल्या गावाचाच लागतो म्हणून आमदारही आपल्या गावाचाच हवा,बाहेरच्याना संधी देण्याचा कोणताही प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक तथा अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील पाटील यांनी देत विकासपुरुष भूमिपुत्र म्हणून अनिल पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांनी ग्रामिण भागात दौरा केला असता भोजमल पाटील
यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले की आमदार कसा असावा?त्याचे व्हिजन कुणासारखे असावे? आणि त्यांच्याकडून विकास कसा व्हावा असा प्रश्न कुणीही केला तरी सहजच आमच्या सारख्यांच्या मुखावर एकच नाव येईल ते म्हणजे अनिल पाटील.आपण या मतदारसंघात एकच वेळा संधी दिली त्यांनी मतदारसंघासाठी संधीचे सोने केले असून गाव तेथे विकास काम झाल्याचे आपण पाहिले आहे.अश्या कर्तबगार व्यक्तीमत्वास एकदा नव्हे तर दोनदा, तीनदा संधी दिलीच पाहिजे.अनिल पाटील रूपाने मंत्रीपद आपल्याला मिळाल्याने दीड वर्षात मोठा फायदा झाला असून निम्न तापी पाडकळरे धरणासाठी 4800 कोटींची सुप्रमा आपण मिळवू शकलो आहे.याशिवाय केंद्रीय योजनेसाठी आपली फाईल केंद्र शासनाकडे पोहोचून आवश्यक त्या अनेक मान्यताही आपल्याला मिळाल्या आहेत.लवकरच आपल्या धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होऊन मोठा निधी मिळण्याचे संकेत स्वतः केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी दिले आहेत.याशिवाय धरणावरून थेट पाईपलाईन द्वारे प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहोचविणारी लिफ्ट योजना देखील अनिल पाटील मंजूर करून या योजनेचे काम देखील सुरु झाले आहे. म्हणजेच अनिल पाटील शेतकरी बांधवांसाठी येणारा काळ अत्यंत सुगीचा असून निश्चितच प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे जीवनमान सुधारण्याचे हे संकेत आहेत. अश्या कर्तबगार व्यक्तिमत्वास आपण पुन्हा संधी दिलीच पाहिजे.
गेल्या पाच वर्षात प्रत्येक नैसर्गिक आपत्ती म्हणजे अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी गारपीट यासाठी अनिल पाटील आपल्या मतदारसंघात शेतकरी बांधवांना मोठी मदत मिळवून दिली असून अनेकांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे.एकंदरीत प्रत्येक शेतकरी बांधवांस काहीतरी मदत मिळालीच आहे हे ग्रामिण भागातील रहिवासी म्हणून मलाही ज्ञात आहे.
अनिल दादा आमदार नव्हते तेव्हा आणि आमदार व मंत्री झाल्यावर देखील प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत आले असून जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारे ते आमदार ठरले आहेत.शहरात देखील अनिल पाटील विकासाच्या बाबतीत कुठेही मागे नसून शहर व ग्रामिण भागात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.अश्या कर्तबगार व्यक्तिकत्वास आपल्याला पुन्हा संधी द्यायची असून बाहेरच्या व्यक्तींना कायमचा बाहेरचा रस्ता आपल्याला दाखवायचा असल्याचे आवाहन भोजमल पाटील यांनी केले आहे.