विमान काळ बनून कोसळलं! चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत, मुलाला वाचवायला गेलेली आईही जखमी.

अहमदाबादहून विमानतळाजवळ घडलेल्या एअर इंडिया AI 171 विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सु्न्न झाला आहे. या भीषण दुर्घटनेत २६५ जणांचा करुण अंत झाला आहे. मृतांमध्ये हॉस्टेलमधील लोकांचा समावेश आहे. यात एका १५ वर्षीय चहावाल्याचाही समावेश आहे. अहमदाबादहून विमानतळाजवळ घडलेल्या एअर इंडिया AI 171 विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सु्न्न झाला आहे. गुरुवारी दुपारी अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेले हे विमान एका मिनिटाच्या आत कोसळले.

या भीषण दुर्घटनेत २६५ जणांचा करुण अंत झाला आहे. ज्यामध्ये २४१ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. उर्वरित मृतांमध्ये हॉस्टेलमधील लोकांचा समावेश आहे. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे देखील निधन झाले आहे. यातच हॉस्टेल परिसरातील लोकही या अपघाताला बळी पडले आहेत. यात एका १५ वर्षीय चहावाल्याचाही समावेश आहे.

एअर इंडियाचे हे विमान ज्या बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळले त्याच कॉलेजच्या आवाराच्या बाहेर आपल्या आईसोबत चहाचे दुकान चालवणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव याच्यावरही मृत्यू ओढावला आहे. तर त्याची आई रेखा यादव या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आहे. सध्या रेखा यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी एअर इंडिया १.४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि विमानाचे काही तुकडे थेट बी. जे. मेडिकल हॉस्टेलच्या परिसरात येऊन पडले. येथेच आकाश आणि त्याची आई नेहमीप्रमाणे आपल्या चहाचे दुकानात काम करत होते आणि विमानाचे तुकडे त्यांच्यावर काळ बनून कोसळले. यात आकाश (१५ वर्षे) याचा करुण अंत झाला. तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..