मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृह जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.

मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृह जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.जळगाव दि. 13 जून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यान्वित मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, ता. जळगाव जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

या वसतिगृहात इयत्ता ८ वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या आणि जळगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.-भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात सादर करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य यांसह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, शासकीय वसतिगृह जळगाव यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..