करिष्मा कपूरचा एक्स नवरा संजय कपूरचे 12 जून रोजी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संजय लंडनमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत होता. आता त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे.बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर याचे 12 जून रोजी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही बातमी कळताच करीना कपूर, सैफ अली खान, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांनी त्वरीत रात्री अभिनेत्रीच्या घरी तिचे सांत्वन करायला धाव घेतली. संजय गार्ड्स पोलो क्लब ऑफ ग्लँडमध्ये पोलो खेळत होता असे सांगण्यात येत आहे. तो अचानक खाली कोसळला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांना त्याला वाचवायला यश आले नाही. आता यातील नवीन अपडेट म्हणजे त्याच्या मृत्यूचे खरे कारण मधमाशी असल्याचे समोर आले आहे.
संजय कपूरला पोलो खेळण्याची खूप आवड होती. गेल्या काही काळापासून तो त्याच्या एक्स हँडलवर मैदानातून पोलो खेळतानाचे फोटो शेअर करत होता. पण 12 जून रोजी झालेल्या त्याच्या मृत्यूने सर्वांना हादरवून टाकले आहे. अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, संजय घोड्यावर बसून पोलो खेळत होता, तेव्हा चुकून एक मधमाशी त्याच्या तोंडात गेली, जी त्याच्या घशात अडकली. यामुळे त्याला जळजळ जाणवू लागली. चिंताग्रस्ततेमुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.संजय कपूर त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघाताबद्दलही दुःख व्यक्त केले होते.









