बाबा तोपर्यंत काळजी घ्या, कॅप्टन सुमित सभरवालचा शेवटचा फोन, 88 वर्षीय वडिलांवर दुःखाचा डोंगर.

पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमीत सभरवाल यांचे 88 वर्षीय वडील या अपघाताची माहिती कळल्यानंतर हादरून गेले आहेत.अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल यांची निवृत्त होऊन वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची ही शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमीत सभरवाल यांचे 88 वर्षीय वडील या अपघाताची माहिती कळल्यानंतर हादरून गेले आहेत. विमानोड्डाणाला तासभर असताना त्यांनी वडिलांना फोन केला होता. लंडनला पोहोचल्यावर फोन करतो, तोवर काळजी घ्या असेही सांगितले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी ही आठवण सांगितली.सभरवाल यांच्या गाठीशी 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुमीत यांच्यावर होती. सभरवाल अविवाहित होते.

अशी माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली.या अपघातात क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. त्या गेली 10 वर्षे हवाईसुंदरी म्हणून कार्यरत होत्या. अपर्णा महाडिक या 40 वर्षांच्या होत्या. त्यांना 9 वर्षांची मुलगी आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या त्या पत्नी होत्या. महाडिक यांचे पती एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत. त्या गोरेगाव येथे राहायच्या. त्यांना एक मुलगी आहे. तर विमानाचे फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर बोरिवलीमध्ये राहायचे. ते अभिनेता विक्रांत मॅस्सीचे भाऊ होते.अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव तुकाराम पवार, वय 68 वर्ष, आणि आशाबेन महादेव पवार वय 60 वर्ष, या दाम्पत्याचा समावेश आहे. त्यांचा एक मुलगा लंडनमध्ये असून, दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करतो. गुरुवारी दुपारी महेश पवार हे नातेवाईक महादेव व आशाबेन यांना सोडण्यास गेले होते. त्यांना सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली अन् त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..