कारला वाचवण्यासाठी करकचून ब्रेक, ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चांदणी चौकात चालकाचा तडफडून अंत.

लोखंडी सळ्या आणि पाईप वाहतूक करणारा हा ट्रेलर चांदणी चौकाच्या अलिकडे महामार्गाच्या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला. इतक्यात एक अर्टिगा कार त्याला आडवी आलीपुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गंगाधाम चौकामध्ये नुकतेच ट्रकने उडवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा मु्द्दा चर्चेत असतानाच आता चांदणी चौकामध्ये एका ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे.अर्टिगा कारला वाचवण्याच्या प्रयत्नात करकचून ब्रेक दाबल्यामुळे सळ्या केबिनमध्ये घुसून झालेल्या अपघातात ट्रेलर चालक आणि साथीदाराला प्राण गमवावे लागले. मुंबईकडून बंगळूरूकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.लोखंडी सळ्या आणि पाईप वाहतूक करणारा हा ट्रेलर चांदणी चौकाच्या अलिकडे महामार्गाच्या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला. इतक्यात एक अर्टिगा कार त्याला आडवी आली. अर्टिगा चालकाने या ट्रेलरसमोर येऊन आपलं वाहन विरुद्ध दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे या ट्रेलर चालकाने अर्टिगाला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला.हा धक्का इतका जोरात होता की त्या ट्रेलरमध्ये असणाऱ्या सळ्या आणि पाईप या थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसल्या. यातच चालकाचा आणि त्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला. हा ट्रेलर मूळचा राजस्थानचा असून ट्रेलर चालक हाच याचा मालक असल्याची माहिती आहे.या अपघातानंतर पोलीस, अग्निशामक दल, जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने ट्रेलर चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सळ्या या केबिनमध्ये घुसल्यामुळे बचाव कार्य करण्यासाठी अडचणी येत होत्या. यंत्रणांनी चालकाला आणि त्याच्या साथीदाराला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.सुरुवातीला अर्धा तास चालकाच्या हालचाली जाणवत होत्या मात्र अर्ध्या तासाने त्या मंदावल्या आणि चालकाने प्राण सोडले.

ज्या अर्टिगा चालकामुळे हा अपघात झाला तो जागेवरून निघून गेला. याबाबत हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.दुसरीकडे, धाम चौकात दुचाकीला धडक देऊन सहप्रवासी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला आणि मालकाला पुणे न्यायालयाने 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्राणांतिक अपघातापूर्वी ट्रकचालकाने मद्यसेवन केले होते का, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. ‘आरटीओ’कड़ून ट्रकची तपासणी केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..