भारतातील १० भीषण विमान अपघात, किती प्रवाशांनी गमावलेत जीव? महाराष्ट्रात किती अपघात?

अहमदाबादमध्ये घडलेला हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी १९८८ मध्ये ‘इंडियन एअरलाइन्स’चे विमान कोसळले होते. त्यामध्ये १३३ जणांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंतचा हा भारतातील सर्वांत भीषण अपघात होता.देशातील भीषण १० विमान अपघात ‘एअर इंडिया’चे अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान गुरुवारी सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीबाहेर कोसळले. ‘एआय १७१’ या विमानात २००हून अधिक प्रवासी होते. अहमदाबादमध्ये घडलेला हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी १९८८ मध्ये ‘इंडियन एअरलाइन्स’चे विमान कोसळले होते. त्यामध्ये १३३ जणांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंतचा हा भारतातील सर्वांत भीषण अपघात होता.हरियाणाच्या चरखी दादरी येथे १२ नोव्हेंबर १९९६ रोजी सौदी आणि कझाकस्तानच्या विमानांची हवेतच धडक होऊन ३४९ जणांचा मृत्यू झाला. ही आजवरच्या हवाई अपघातांतील सर्वांत भीषण टक्कर मानली जाते. कझाक वैमानिकांना इंग्रजी भाषेतील सूचना न समजल्यामुळे ते १५ हजार फुटांऐवजी १४ हजार फुटांवर गेले आणि अपघात झाला.मुंबईहून दुबईला जाणारे एअर इंडियाचे ‘एम्परर अशोक हे विमान टेकऑफ नंतर केवळ चार मिनिटांत आणि दोन मैल अंतरावर समुद्रात कोसळले.

हा अपघात एक जानेवारी १९७८ रोजी झाला. या अपघातात २१३ जणांचा मृत्यू झालाः वैमानिकांची चूक आणि उपकरणांच्या बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर वैमानिकांच्या पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.’एअर इंडिया एक्सप्रेस’चे विमान २२ मे २०१० रोजी मंगळुरू विमानतळावर उतरताना धडकेनंतर दरीत कोसळले. या अपघातात १५८ जणांचा मृत्यू झाला. मंगळुरू विमानतळाची ‘टेबलटॉप’ धावपट्टी धोकादायक आहे. वैमानिकाने ‘लैंडिंग’चा निर्णय वेळेवर न घेतल्याने हा अपघात झाला.’इंडियन एअरलाइन्स’चे ‘आयसी ११३’ हे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. या अपघातात १३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. वाईट हवामान, अपुरी दृश्यमानता आणि प्रक्रियांचे पालन न करणे ही या अपघाताची प्रमुख कारणे ठरली. ५ इम्फाळ (१९९१) इंडियन एअरलाइन्सच्या कलकत्ता-इम्फाळ-दिमापूर मार्गावर विमान अपघात झाला. इम्फाळच्या डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. त्यात ६९ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात ६३ प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता.इंडियन एअरलाइन्सच्या कलकत्ता-इम्फाळ-दिमापूर मार्गावर विमान अपघात झाला. इम्फाळच्या डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. त्यात ६९ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात ६३ प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता.कोलकाता-पाटणा-लखनौ-दिल्ली मार्गावर उडत असणारे’ अलायन्स एअर ‘चे विमान १७ जुलै २००० रोजी पाटण्यात कोसळले.

अपघातात विमानातील ५५ प्रवासी आणि पाच जमिनीवरील लोक मृत्युमुखी पडले. ७ कोळीकोड अपघात (२०२०) सात ऑगस्ट २०२० रोजी दुबईहून ‘वंदे भारत’ मोहीमेतर्गत येणारे ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’चे विमान केरळमधील कोळीकोड येथे कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वैमानिकासह २० जणांचा मृत्यू झाला. टेबलटॉप धावपट्टीमुळे झालेल्या अपघातासाठी वैमानिकांच्या चुकीला जबाबदार धरण्यात आले. विमान धावपट्टीवरून घसरून ११० फूट खाली कोसळले.सात ऑगस्ट २०२० रोजी दुबईहून ‘वंदे भारत’ मोहीमेंतर्गत येणारे ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’चे विमान केरळमधील कोळीकोड येथे कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वैमानिकासह २० जणांचा मृत्यू झाला. टेबलटॉप धावपट्टीमुळे झालेल्या अपघातासाठी वैमानिकांच्या चुकीला जबाबदार धरण्यात आले. विमान धावपट्टीवरून घसरून ११० फूट खाली कोसळले.’इंडियन एअरलाइन्स’चे’ आयसी ४९१’ हे विमान औरंगाबाद येथे कोसळून ५५ जणांचा मृत्यू झाला. हे विमान धावपट्टीच्या टोकाला उचलले गेले आणि धावपट्टीपासून ४१० फूट अंतरावरील ट्रकवर आदळले, धावपट्टीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हायटेन्शन विजेच्या तारांना घडकलेले विमान जमिनीवर आदळले. वैमानिकाची चूक आणि वाहतुकीचे नियमन करण्यात अधिकाऱ्यांना आलेले अपयश या दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले.’इंडियन एअरलाइन्स चे विमान मुंबईत कोसळले. यातील सर्वच्या सर्व ९५ प्रवासी मृत्युमुखी पडले.’इंडियन एअरलाइन्स’ची ‘आयसी ६०५’ हे विमान बेंगळुरूत कोसळून ९२ जणांचा मृत्यू झाला. वैमानिकांची चूक आणि संभाव्य तांत्रिक गोंधळ हे कारण मानले गेले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..