भविष्य घडवण्याच्या वयात नको त्या भानगडीत पडला, Love Triangle मध्ये १७ वर्षांचा युवक जिवानीशी गेला.

प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली. परंतु ज्या वयात स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी स्वतःला तयार करायचं असतं त्या वयात तरुण मुलं नको त्या प्रकारात अडकून स्वतःला नेस्तनाबूत करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.पिंपरी चिंचवड परिसरतील देहूरोड भागातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाने एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. यात आणखी धक्कादायक म्हणजे दोन्ही तरुणांचे एकाच मुलीवर प्रेम असल्याची माहिती समोर आली असून, त्यातून प्रेमात अडथळा नकॊ म्हूणन एका तरुणाने दुसऱ्या तरुणाचा काटा काढला आहे.मृत्‍यू झालेल्या मुलाचे वय १७ वर्षे असून तो, थॉमस कॉलनी, देहूरोड येथील रहिवासी आहे. या प्रकरणी आरोपी सनी सिंग हा फरार झाला आहे. या प्रकरणी अरूण मौर्या हा गंभीर जखमी झाला असून त्याने याबाबत देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

बुधवारी (दि. ११) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सनी सिंग याच्या मैत्रिणीसोबत पीडित मुलाचे(ज्याचा मृत्यू झाला) प्रेम संबंध होते. त्यामुळे सनी सिंग याच्या मनात त्याच्याविषयी विषयी राग होता. त्यानुसार सनी याने त्याला बुधवारी (दि. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास थॉमस कॉलनी, देहूरोड येथे बोलावून घेतले. मात्र रात्रीची वेळ असल्याने पीडित मुलगा हा आपल्या चुलत भावाला घेऊन देहूरोड येथे सनीच्या भेटीसाठी आला.त्या ठिकाणी सनी आणि त्या मुलात प्रेमसंबंधाच्या कारणातून वाद झाला. त्या वादातून सनीने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला.

त्यावेळी चुलत भाऊ अरूण मध्ये आला म्हणून सनी याने अरुणच्याही छातीवर वार केला आणि तिथून पळून गेला. त्यात १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर अरुण मौर्या हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फरार आरोपी सनी सिंग याच्या शोधार्थ पोलीस ठाण्यातील पथके रवाना करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली. परंतु ज्या वयात स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी स्वतःला तयार करायचं असतं त्या वयात तरुण मुलं नको त्या प्रकारात अडकून स्वतःला नेस्तनाबूत करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..