बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुजरातला, परतीच्या प्रवासात अर्जुनला मृत्यूने कवेत घेतलं.

अर्जुनभाई मनूभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते. ते काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते.अहमदाबादमध्ये झालेल्या दुःखद विमान दुर्घटनेत गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी अर्जुनभाई मनूभाई पटोलिया यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तिचे अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधी करण्यासाठी अर्जुनभाई हे लंडनहून वडिया येथे आले होते. मात्र 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या विमानातून लंडनला परत जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर आणि वाडिया गावावर शोककळा पसरली आहे.अर्जुनभाई मनूभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते. ते काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले होते.

पत्नीच्या अंतिम इच्छेनुसार, तिच्या अस्थी वाडिया येथे आणून विसर्जित करण्यासाठी अर्जुनभाई आपल्या गावी आले होते. 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या AI171 विमानातून ते लंडनला परत जाण्यासाठी निघाले होते.सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी झेपावलेले एअर इंडियाचे बोइंग 787 ड्रीमलायनर हे विमान उड्डाणानंतर क्षणार्धात कोसळले. या अपघातात विमानातील 241 प्रवाशांचा तर जमिनीवरील 24 जणांचा मृत्यू झाला. आश्चर्य म्हणजे एक प्रवासी या अपघातातून सुखरूप बचावला आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह 168 भारतीय, 52 ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाच्या नागरिकाचा समावेश आहे.

दुर्दैवाने, हे विमान अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ कोसळले. या दुर्घटनेत अर्जुनभाईंचा मृत्यू झाला. अर्जुनभाईंच्या पश्चात सुरतमध्ये राहणारी त्यांची आई आणि लंडनमध्ये राहणारी दोन मुलं आहेत. आधीच मातृछत्र हरपलेल्या या मुलांना आता पितृशोक झाला आहे.अहमदाबादच्या मेघाणीनगर परिसरात गुरुवारी दुपारी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर क्रॅश झाले. या दुर्घटनेत 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर इमारतीतील 24 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता.दरम्यान, अर्जुनभाईंच्या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर या मुलांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नातेवाईकांना सतावत आहे. या दुर्घटनेमुळे वाडिया गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..