या आसमानी संकटात मतदारसंघातील नागरीक व शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदतीसाठी तत्पर…

काल बुधवार, दिनांक – ११ जुन, २०२५ रोजी संपुर्ण मतदारसंघात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले, घरांवरील पत्रे उडाली, घराचा भिंती कोसळल्या, शेतकऱ्यांचा शेतात उभी पिके जमीनदोस्त झाली, पशुधनांचे मोठे नुकसान होवुन जिवीतहानी देखील झाली, काही ठिकाणी झाडे, घरे पडुन जिवीतहानी झाली आहे. ह्या आसमानी संकटाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.काल या पावसानंतर लागलीच संबंधित अधिकाऱ्यांशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून सरसकट पंचनामे करण्याचा सुचना दिल्या असल्या, तरी आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा बांधावर, तसेच पडझड झालेल्या घरांची एरंडोल तालुक्यात पाहणी केली.

या पाहणीवेळी प्रशासनाकडुन सरसकट पंचनामे, प्रशासनाकडुन आवश्यक ते सहकार्य नागरीक व शेतकऱ्यांना होते आहे का, याबाबत चौकशी केली.ह्या आसमानी संकटाने नुकसान झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांसह नागरीकांचे जनजीवन हे विस्कळीत झाले आहे, उभी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसटावुन गेला तर घरांचा नुकसानीने उभा संसार रस्त्यावर आला.यात प्रशासनासह मी देखील मतदारसंघातील नागरीक व बळीराजाचा सोबत खंबीरपणे उभा असुन या संकटात खचुन न जाता सर्वोतोपरी मदत मिळवुन देण्यासाठी तत्पर असल्याचे या पाहाणीवेळी उपस्थित शेतकरी व नागरीकांना आश्वासित केले.प्रसंगी धरणगांव बाजार समितीचे संचालक देविदास चौधरी सर, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, खेडी येथील पन्नाभाऊ सोनवणे, दापोरी येथील भिकाभाऊ कोळी, कुंदन कोळी, पवन पाटील, रवंजे येथील संदीप पाटील, खर्ची येथील अजित पाटील यांचेसह स्थानिक नागरीक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..