ना धरण फुटलं, ना नदीला पूर; मग सेटवर अचानक इतकं पाणी आलं कुठून? अनेक जण जखमी.

राम चरणच्या सेटवर अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात बरेच जण जखमी झाल्याचे म्हटले जाते.मुंबई- राम चरण च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. साऊथकडील सुपरहिट अभिनेता राम चरणच्या ‘इंडिया हाऊस’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंग सेटवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. या सेटवरील पाण्याची टाकी फुटल्याने अनेक लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आल्याचे समोल आले आहे. त्यावेळी राम चरण आणि चित्रपटाचा मुख्य अभिनेता निखिल सिद्धार्थ शूटिंगसाठी तिथे उपस्थित होता की नाही हे अद्याप मीडिया रिपोर्ट्समध्ये कळलेले नाही, परंतु पाण्याची टाकी फुटल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि या दुर्घटनेमध्ये अनेक लोक जखमीसुद्धा झाले आहेत.

इंडिया हाऊस या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होते. चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स शूट करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यासारखा एक सेट बांधण्यात आला होता. बातमीनुसार, शूटिंग दरम्यान अचानक पाण्याची टाकी फुटली त्यामुळे शूटिंग सेटवर पाणी वेगाने पसरले. पाण्याचा वेगवान प्रवाह खूप जास्त आणि मोठा होता, शूटिंग सेटवर पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सेटवर उपस्थित असलेले क्रू मेंबर्स तिथे उपस्थित असलेल्या मालमत्तेला आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसले. या अपघातात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.बातमीनुसार, जखमींना हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

अपघातात किती लोक जखमी झाले आहेत, काही जीवितहानी झाली आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शूटिंगच्या वेळी राम चरण आणि निखिल तिथे उपस्थित होते की नाही याबद्दलही कोणतीही माहिती नाही.राम चरणच्या आगामी चित्रपट ‘द इंडिया हाऊस’बद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट एका स्वातंत्र्यसैनिकाच्या जीवनावर आधारित आहे. 2023 मध्ये वीर सावरकरांच्या 140 व्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ आणि सई मांजरेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राम चरण या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटाची कथा स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. चित्रपटाची औपचारिक घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..