शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत 20 जूनपासून लीड्समध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संध सध्या इंग्लंड दौऱ्यावर सराव करताना दिसत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारत कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. इंग्लंडच्या उपकर्णधाराने विराटबद्दल केलेले वक्तव्य खूपच चर्चेत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत 20 जूनपासून लीड्समध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवली जाणार आहे. 20 जून पासून सुरु होणारी ही मालिका 4 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारतीय संध सध्या इंग्लंड दौऱ्यावर सराव करताना दिसत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारत कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. इंग्लंडच्या उपकर्णधाराने विराटबद्दल केलेले वक्तव्य खूपच चर्चेत आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताने या हाय-प्रोफाइल मालिकेसाठी एक तरुण संघ निवडला आहे. पोप एका मुलाखतीत म्हणाला, “हा एक तरुण संघ आहे पण या भारतीय खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच तरुण खेळाडू आहेत. अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यांचा नवा कर्णधार शुभमन गिल एक उत्तम खेळाडू आहे. त्यांना स्लिपमध्ये उभे राहून किलबिलाट करणाऱ्या विराट कोहलीची उणीव भासेल. पण त्यांच्या खेळाडूंकडे चांगली प्रतिभा आहे त्यामुळे ते आत्मविश्वासाने भरलेले असतील. पण आमचे खेळाडू यासाठी सज्ज आहेत.”भारताने 2007 पासून इंग्लंडमध्ये कोणतीही कसोटी मालिका जिंकलेली नाही.









