साताऱ्यातील डॉक्टरनेच महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ का बनवले? धक्कादायक कारण समोर.

 सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एका धक्कादायक घटनेत, डॉ. राजेश शिंदे यांनी ‘एआय’चा वापर करून महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते व्हॉट्सॲपवर व्हायरल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.सातारा: कराडमध्ये ‘एआय’चा वापर करून महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सॲपवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डॉ. राजेश शिंदे याच्यावर आरोप असून, त्यांनी आरोग्य विभागाला निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचा संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.कराड येथे ‘एआय’ चा घातक वापर करुन महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ तयार करून व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे कराडच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. संशयित आरोपी डॉ. राजेश शिंदे याच्या ‘किलेक्शन थेरपी सेंटर’ विरोधात विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या.

त्याबद्दलची पाहणी करून आरोग्य विभागाने निगेटिव्ह रिपोर्टिंग केले होते. याचा राग मनात धरून आरोपी डॉ. राजेश शिंदे याने ‘एआय’च्या माध्यमातून २ महिला डॉक्टरांसह चौघांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचे समोर येत आहे.एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कराड शहरातील दोन महिला डॉक्टरांसह एका तरूणी आणि एका तरूणाचा अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आता संशयित आरोपीने हे कृत्य का केले? याची माहिती समोर येऊ लागली आहे. कराड शहराच्या पूर्वेकडे संशयित आरोपी राजेश शिंदे याचे किलेक्शन थेरपी सेंटर आहे. तेथील उपचारासंदर्भात काही संघटनांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल देण्याची सूचना शासकीय वैद्यकीय सूत्रांना केली होती.

त्यानुसार समक्ष थेरपी सेंटरची पाहणी केल्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले. त्यानुसार संबंधित तपासणी अधिकाऱ्यांनी तसा अहवाल आरोग्य विभागाकडे पाठवला.या सर्व घटनेचा राग मनात धरून डॉ. राजेश शिंदे याने 2 महिला डॉक्टरांसह एक तरुणी आणि एका तरुणाचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवला. डॉ. राजेश शिंदे याने पंजाबमधील त्याच्या परिचयाच्या विकास शर्मा याला सदर व्हिडिओ पाठवले. तसेच या संबंधित डॉक्टरांचे नंबर्स पाठवून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करायला सांगितला. त्या ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ शर्मा याने डॉक्टर राजेश शिंदे याच्या सांगण्यावरून शेअर केले अशी माहिती तपासात समोर येत आहे.याप्रकरणी कराडमधील नामांकित डॉक्टरसह दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..