भुसावळ शहरात ग्लिरिसिडिया ‘उंदीर मारी’ झाडांचा बहर; निसर्गप्रेमींच्या नजरा खिळल्या .

उन्हाळ्याच्या भर उन्हातही निसर्ग आपली रंगसंगती विसरत नाही, याचा प्रत्यय भुसावळ शहरात रेल्वे हॉस्पिटलजवळील रस्त्यावर ग्लिरिसिडिया (स्थानिक नाव: उंदीर मारी) या झाडांच्या मोहक फुलांनी आलेल्या बहारातून येतो. गुलाबी-पांढऱ्या फुलांनी बहरलेले हे झाड सध्या परिसरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
ग्लिरिसिडिया हे झाड जलद वाढणारे, नत्र साठवणारे व पर्यावरणस्नेही असून शेतकऱ्यांसाठी तसेच पर्यावरणप्रेमींसाठी उपयुक्त मानले जाते.

शेतीच्या सीमारेषांवर कुंपणासाठी, हिरवळीच्या खतासाठी आणि कीटकनाशक म्हणून याचा उपयोग केला जातो. याच्या वासामुळे उंदीर दूर पळतात, म्हणून याला उंदीर मारी असे नाव प्राप्त झाले आहे. पर्यावरण तज्ज्ञांकडून नोंद : – या झाडाचा बहार टिपण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ प्रा. के. पी. चौधरी यांनी फुलगाव येथून भुसावळ शहरातील प्रभाकर हॉल येथे विवाहप्रसंगी येताना, रेल्वे हॉस्पिटलजवळील झाडाचे छायाचित्र टिपले. त्यांच्यासमवेत एन. ए. देशमुख पर्यवेक्षक गं . सां. चौधरी विद्यालय वरणगांव हे उपस्थित होते. पर्यावरणासाठी वरदान : -हे झाड जमिनीत नत्र वाढवते, मातीची धूप थांबवते आणि मधमाशा, फुलपाखरांना आकर्षित करते. याचा बहर फक्त सौंदर्यासाठी नव्हे, तर जैवविविधतेसाठीही अत्यंत उपयुक्त आहे.निसर्गाच्या या रंगीबेरंगी भेटीमुळे भुसावळ शहरात एक आल्हाददायक अनुभव मिळत आहे. नागरिकांनीही याची जपणूक करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमी प्रा के पी चौधरी करत आहेत. फुलगांव ग्रामपंचायत परिसरात हा वृक्ष आहे पण अजून फुलबहर येण्या एवढी पुरेसी वाढ झाली नाही .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..