होय, मी राजाच्या हत्येत सहभागी! अखेर सोनम रघुवंशीची कबुली, पुरावे पाहून ढसाढसा रडली.

सोनम रघुवंशी हिने अखेर राजा रघुवंशीच्या हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली असता अखेर तिने राजाच्या हत्येच्या कटात सहभामेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात एक मोठी माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान सोनम रघुवंशी ने तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याची कबुली दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलाँगमधील पोलिसांनी सोनमसमोर घटनेशी संबंधित भक्कम पुरावे सादर केले तेव्हा तिला रडू कोसळलं. त्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान मेघालय पोलिसांनी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांना समोरासमोर आणले.मेघालय पोलिसांची एसआयटी राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास करत आहे.

आता मेघालय पोलीस संपूर्ण क्राइम सीनला रीक्रिएट करण्याची तयारी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनास्थळावरून काही डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅट्स देखील सापडले आहेत, जे हत्येचा कट सिद्ध करतात.इंदूरचे रहिवासी असलेले राजा आणि सोनम रघुवंशी हनिमून साजरा करण्यासाठी मेघालयात गेले होते. तिथे राजाचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यानंतर हे प्रकरण हत्येचं असल्याचं समोर आलं. मेघालय पोलिसांनी तपासाची गती वाढवली, याप्रकरणी सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. आता सोनमच्या कबुलीनंतर या प्रकरणाने निर्णायक वळण घेतले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, लवकरच संपूर्ण घटनेबाबत माहिती देण्यासाठी अधिकृत पत्रकार परिषद घेतली जाईल. तसेच, या कटात सहभागी असलेल्या इतर लोकांनाही अटक केली जाऊ शकते.शिलाँगच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालय पोलिसांनी तपासाला ‘ऑपरेशन हनिमून’ असे नाव दिले आहे. इंदूर आणि गाझीपूरमधील आरोपींच्या घरुन आणि इतर ठिकाणांहून पुरावे गोळा केले आहेत. राजा रघुवंशी याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तिच्या तीन साथीदारांना मध्य प्रदेशातील इंदूर आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.गी असल्याचं कबुल केलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..