एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षातून महायुतीमधील घटकपक्षांमध्ये इनकमिंग वाढलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात वैभव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे ते प्रतिस्पर्धी आहेत. सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. सत्यजीत पाटणकर यांच्या भाजप प्रवेशवर शंभूराज देसाई हे नाराज असल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं.










