बच्चू कडूंची प्रकृती खालावली, वजन 4 किलोने घटलं, शरद पवारांचा फोन, मनोज जरांगे भेट घेणार, कुणाकुणाचा पाठिंबा?

प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadun) यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगरले आहे. दरम्यान त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा (Bacchu Kadu Prahar Andolan) आजचा चौथा दिवस असून बच्चू कडूंची प्रकृती आता खालावली आहे. अशातच आरोग्य विभागाच्या पथकाकडून बच्चू कडू यांची तपासणी केली असता कडू यांचे वजन 4 किलोने कमी झाले आहे. तर रक्तदाब वाढलेला आहे. तीवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी केली गेलीय. असं असलं तरी बच्चू कडू यांनी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे. मी पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो. हे आंदोलन तीन उद्देशासाठी आम्ही करत आहे. आम्ही जिवंत आहोत हे आम्हाला सांगायचं आहे. जो शेतकरी जाती धर्मामध्ये विभागलेला आहे. पण त्याने शेतकरी म्हणून जगावं, त्याचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन आहे आणि तिसरे आम्ही सरकारला सध्या काय स्थिती आहे, हे आम्ही सांगितले पाहिजे, शेतमाल भाव घसरले आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन करत बच्चू कडू यांनी या अन्नत्याग आंदोलनावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, आम्ही मंत्री असतानाही शेतकऱ्यांचा आवाज उचलला. काल पालकमंत्री बावनकुळे यांचं दमदाटी सारखं वागले, याचा आम्ही निषेध करतो. आम्ही मरण पत्करू पण झुकणार नाही. आज मनोज जरांगे, रोहित पवार येताय. यांच्याकडून मला अपेक्षा आहे की या आंदोलनाचे परिणाम राज्यात उमटले पाहिजे. बावनकुळे म्हणाले की, आम्ही पाच वर्षात केव्हाही कर्जमाफी देणार. पण केव्हा देणार हे त्यांनी सांगावं. मुख्यमंत्री मागणी पूर्ण करत नाहीये. तुम्हाला जाहीर करावंच लागेल. असंही  बच्चू कडू म्हणाले. मुख्यमंत्री साहेब रोज आत्महत्या होताय. मंदिरात जरी तुम्ही पुण्य कमावलं असेल पण या राज्यात आत्महत्या झालेल्याचं पाप कुठं फेडणार. असेही  बच्चू कडू म्हणाले.दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून ही बच्चू कडूंच्या मागण्यांचे समर्थन केलं जात आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते नितेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचे फोन वर बोलणं करून दिलं. यावेळी शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा वडीलकीचा सल्ला दिलाय. अशातच राज्यातील इतर नेते देखील आज  कडूंच्याआंदोलन स्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे. प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत प्रहारचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.  दरम्यान, मला जरी पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी माझे कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आंदोलन करतीलच, सभेत काळे झेंडे दाखविले जाणारच, असा इशारा प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..