सासऱ्याला हार्ट अटॅक, जावयाने 5 तासात ‘गेम’ केला, कारमध्ये बॉडी सापडली, डॉक्टर मुलीने काय केलं?

 छत्रपती संभाजीनगरमध्ये जावयाने सासरवाडीत पत्नीसोबत भांडण केले. सासू-सासऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने सासऱ्यांना ढकलून दिले. यात ते बेशुद्ध झाले आणि जावयाने त्यांना रुग्णालयात नेले. मात्र त्यानंतर त्याने जे काही केलं ते ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.सासरवाडीत जाऊन पत्नी सोबत भांडण केलं. सासू-सासर्‍यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सासर्‍याला जोरात ढकलून दिल्याने ते खाली कोसळले. हृदयावर दाब आल्याने सासरे बेशुद्ध पडले. सासर्‍याला रुग्णालयात घेऊन गेला, मात्र कार तासभर रुग्णालया बाहेरच ठेवलं, नंतर मृतदेह घरी येऊन गेला. याबाबत पत्नीला शंका आल्याने तिने रुग्णालयात विचारपूस केली असता असा रुग्ण आलाच नाही अशी माहिती मिळाली. त्यावेळी जावयाचा हा प्रताप समोर आला. याप्रकरणी सिडको पोलीस स्थानामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अखिलेश मोदिराज वय ३८ रा. नंदनवन कॉलनी असे अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे.तर सुनीलकुमार चोप्रा वय ६८ रा.एन- ५ असे मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील कुमार चोप्रा यांच्या दोन्ही मुलींचा विवाह झाला आहे.

मोठी मुलगी स्वाती हिचा अखिलेश याच्यासोबत विवाह झाला. मात्र लग्नानंतर सतत त्यांच्यामध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. १मे रोजी रात्रीच्या सुमारास अखेरेश सासरवाडीत आला. पत्नी सोबत भांडण सुरू केले. सासू-सासर्‍यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याने सासऱ्यांना ढकलून दिले यात ते खाली कोसळेल. ज्येष्ठ नागरिक सुनील यांच्या हृदयावर दाब आल्याने ते बेशुद्ध पडले. रात्री अकरा वाजता जावई अखिलेश चालकाला घेऊन सासऱ्यांना रुग्णालयात घेऊन जातो म्हणून गेला.पती अखिलेश वडिलांना रुग्णालयात घेऊन गेला असल्याने पत्नी स्वाती देखील रुग्णालयात गेली. बाहेरच अखिलेश स्वातीला भेटला कॅज्युअलिटीमध्ये सासऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मी इथे थांबतो तू मुलांना घेऊन घरी जा असं त्याने पत्नीला सांगितले. मात्र पहाटे चार वाजेच्या सुमारास अखिलेश थेट मृतदेह घेऊनच घरी आला.

कुटुंबीयांनी संविच्छेदनाची मागणी केली असता त्याने त्यावरून देखील वाद घातला.डॉक्टर आसलेली मुलगी आणि पत्नीला या मृत्यू बाबत शंका असल्याने त्यांनी या प्रकरणात माहिती घ्यायला सुरुवात केली. पतीने ज्या रुग्णालयात वडिलांना आणलं त्या रुग्णालयात अर्जाद्वारे कागदपत्रे मागवली. मात्र रुग्णालय प्रशासनाने सुनील नावाचा कुठलाच रुग्ण १ मे रोजी दाखल झाला नाही. किंवा या नावाच्या व्यक्तीवर उपचार झाले नाहीत अशी धक्कादायक माहिती दिली. स्वाती यांच्या पती अखिलेशचा बनाव उघडकीस आला. या प्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीवरून अखिलेश याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..