आधी भाऊ, बहीण, मग वडील, जीव वाचवताना तिघांचा मृत्यू; अग्निकांडामुळे कुटुंबावर मोठा आघात.

दिल्ली येथे एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन लहान मुलं आणि त्यांच्या वडिलांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेतली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.दिल्लीतील द्वारका येथील एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. काही वेळातच संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यावेळी स्वतःला वाचवण्यासाठी एका कुटुंबातील सदस्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली. या अपघातात एक मुलगा, एक मुलगी आणि वडील मृत्युमुखी पडले आहेत. ही घटना मंगळवारी (10 जून) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील द्वारका सेक्टर-13 येथील एका अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

आगीने इमारतीला वेढलेले पाहून सातव्या मजल्यावर राहणारं एक कुटुंब घाबरलं आणि जीव वाचवण्यासाठी वडिलांनी आपल्या दोन मुलांसह इमारतीवरुन खाली उडी मारली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका सेक्टर 13 येथील शपथ सोसायटीमध्ये आठव्या आणि नवव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. दोन मुलांनी स्वतःला वाचवण्यासाठी बाल्कनीतून उडी मारली आणि त्यांना आकाश रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. नंतर, या मुलांचे वडील यश यादव (35 वर्षे) यांनीही बाल्कनीतून उडी मारली आणि आयजीआय हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले.

यश यादव फ्लेक्स बोर्ड व्यवसायात सहभागी होते.यश यादव यांची पत्नी आणि मोठा मुलगा आगीतून वाचले आणि ते सुरक्षित आहेत. त्यांना वैद्यकीय मदतीसाठी आयजीआय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. सोसायटीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. वीज आणि पीएनजी कनेक्शनसारख्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डीडीए आणि एमसीडीला कळविण्यात आले आहे. कुटुंबाला मदत करण्यासाठी आकाश आणि आयजीआय हॉस्पिटलमध्ये पथके तैनात करण्यात आली आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..