“राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारच, दादांचा पक्ष आणि त्यांचा कार्यक्रम…”; काकांवर हल्लाबोल करत काय म्हणाले रोहित पवार?

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यानंतर आजचा हा वर्धापन सोहळा खास असणार आहे. कारण शरद पवारांपासून विभक्त झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचाही वर्धापन सोहळा आजच आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याबद्दल विचारणा केली असता रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम वेगळा आहे, कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे१९९९ मध्ये स्थापन झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २६ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर Sharad  आणि यांच्याकडून पक्षाचा वेगवेगळा वर्धापन दिन एकाच दिवशी साजरा करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यातील बालगंधर्व रंगमदिर इथे साजरा होईल. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल इथे पार पडणार आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार र यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा शरद पवार पक्षाचे प्रमुख होते आणि आजही तेच आहेत.” २६ वर्षांच्या या कालावधीत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच लोकांच्या हितासाठी लढला असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर, पक्षाने काही काळ सत्ता उपभोगली आहे.

तर काही काळ विरोधी पक्ष म्हणून काम केले. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. ज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यानंतर आजचा हा वर्धापन सोहळा खास असणार आहे. कारण शरद पवारांपासून विभक्त झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचाही वर्धापन सोहळा आजच आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याबद्दल विचारणा केली असता रोहित पवार म्हणाले की, “अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम वेगळा आहे, कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे. अजित पवारांचा गट मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करून वर्धापन दिन साजरा करेल. तर, शरद पवार म्हणतात, पक्ष एक कुटुंब आहे आणि कार्यक्रमही तसाच व्हायला हवा. शक्तिप्रदर्शनापेक्षा लोकांनी प्रेमाने कार्यक्रमाला यावे.” पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे.

सत्तेत असताना आणि विरोधात असतानाही त्यांनी लोकांचे प्रश्न मांडले आहेत.यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी म्हटले की, हाके जे बोलत आहेत, त्यात त्यांची चूक नाही. सत्तेत असलेले मोठे लोक त्यांना बोलायला लावत आहेत. “जातिवाद, धर्मवाद राहिला पाहिजे असं सत्तेतील काही मोठ्या लोकांना वाटतं,” असेही पवार म्हणाले. सत्तेत असलेल्या लोकांना स्वतःहून हे बोलता येत नाही. त्यामुळे ते लक्ष्मण हाके यांच्यासारख्या सामान्य माणसांचा वापर करतात. हाके हे कोणाच्यातरी सांगण्यावरून बोलत आहेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ, सत्तेतील काही लोकांना समाजात तेढ निर्माण करायची आहे, असा आरोप त्यांनी केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..