पक्षफुटीवर शरद पवारांचे थेट भाष्य; अजित पवारांना टोला?, म्हणाले, काही विरोधी विचारांसोबत…

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा हा पक्ष आहे, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत महिलांना ५० टक्के उमेदवारी देण्याची घोषणा त्यांनी केली.आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन आहे. यावेळी पुण्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील प्रमुख नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. शरद पवार यांनी म्हटले की, हा पक्ष सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी देतो. महाराष्ट्राचा चेहरा बदलणाऱ्यांना कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. तुम्हा सगळ्यांच्या बांधिलकीवर आणि कष्टावर हा पक्ष उभा आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुका 2 ते 3 महिन्यावर आल्या आहेत. तिथं 50 टक्के भगिनींना निवडून द्यायचं आहे. त्यांना संधी दिली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात.पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, हा धोरणत्मक निर्णय आपण घेतलेला आहे, तो यशस्वी करण्याच काम येत्या निवडणुकीत आपल्याला करायचे आहे.

पक्षांमध्ये संकट आली फूट पडली फूट पडेल असं कधीच वाटतं नाही, काही विरोधी विचारांसोबत गेली आणि ही फूट पडली यावर मला अधिक भाष्य करायचं नाही जे राहिले ते विचारवादी राहिले, असल्याचे बोलताना शरद पवार दिसले. शरद पवार यांनी एकप्रकारे अजित पवार यांच्यावरच निशाणा साधला.जयंतरावांनी संघटना मजबूत करण्याचे काम केले. पुढचे तीन महिने महिलांना प्रवाहात आणले जाईल. हाडांच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीला लोकांचा प्रतिसाद मिळाला. मला 100 विश्वास आहे, येत्या निवडणुकीत चांगले चित्र पाहायला मिळेल.

निलेश लंके सारखे लोक हे राष्ट्रवादीचा मौल्यवान ठेवा आहे, म्हणत शरद पवार यांनी लंकेचे काैतुक केले आहे.पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपण महिलांना 50 टक्के संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळेच आता आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार गटाकडून महिलांना मोठी संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. पुढील काही महिन्यात महिलांना अधिक प्रवाहात आणले जाईल, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..