देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत आहे.देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या मोठी आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना पाय पसरत आहे, येथे सक्रीय रुग्णांची संख्या ७०० पार पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातही ६०७ सक्रीय रुग्ण आहेत. प्रत्येक राज्यात संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.
केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे हजार च्या पार सक्रीय रुग्णांचा आकडा गेला आहे. गुजरातमध्ये ९८० तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये ७४७ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागही अॅक्शन मोडवर असून कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच लोकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२५ पासून दिल्लीत कोविडमुळे ७ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये २ जण दगावले.









