कंठ दाटला अन् ती घोषणा अखेर केलीच! वर्धापनदिनीच जयंत पाटलांनी शरद पवारांकडे केली मोठी मागणी.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज बोलून दाखवली.पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे संकेत दिले. पुण्यामध्ये झालेल्या या कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. “नव्या लोकांना संधी द्या,” असे ते म्हणाले. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. “मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन की, नवीन लोकांना संधी द्यावी. शेवटी पक्ष पवार साहेबांच्या आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला.

कार्यकर्त्यांनी ‘नाही नाही’ म्हणत जयंत पाटील यांच्या इच्छेला विरोध दर्शवला.जयंत पाटील पुढे म्हणाले, “आपण सगळे पुन्हा कामाला लागलो, तर ही राजकीय लढाई आपण जिंकू शकतो.” त्यांनी ही लढाई ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’ अशी असल्याचं म्हटलं. कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याची तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. “पराभवाची चर्चा करू नका, रणात झुंजणारे अजून बाकी आहेत,” असे ते म्हणाले.यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “ज्या शिवभोजन थाळीने अनेकांना तारलं, तीच शिवभोजन थाळी सरकारने बंद केली,” असा टोला त्यांनी लगावला. “एखाद्या मुलीला जीव द्यावा लागतो, तेव्हा सरकार त्याची नोंद घेतं,” असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. “पवार साहेबांवर विनाकारण टीका सुरू आहे. पवार साहेबांनी OBCच्या हक्काची कायम भूमिका घेतली आहे,” असे ते म्हणाले.

“मंडल आयोग लागू करण्याची भूमिका कोणी घेतली असेल, तर शरद पवार नावाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली,” अशी आठवण त्यांनी करून दिली. “ओबीसींच्या हक्काचं काम आयुष्यभर शरद पवारांनी केलं, हे विसरता कामा नये. आजही त्यांचं तेच काम आहे, ओबीसींच्या हिताच्या रक्षणाचे काम ते करत आहेत,” असे उद्गार त्यांनी काढले. “पवार साहेबांना अजूनही टीकेचे लक्ष केले जाते, कारण ‘पवार साहब का डर अभी भी बाकी है’,” असे ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विधानसभा निवडणुकीत आलेल्या निराशाजनक निकालावरही त्यांनी भाष्य केले. “महाविकास आघाडीच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे, असं 11 कोटी जनतेला वाटत होतं. मात्र, निकाल वेगळे लागले,” असे ते म्हणाले. देशाच्या विरोधी पक्षनेत्याने निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत, पण त्यावर निवडणूक आयोग काही बोलत नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.दरम्यान, “गेल्या 14-15 वर्षात पक्षाने मोठे यश मिळवले. पण 2014 साली भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागली. मात्र कार्यकर्ते शरद पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो, प्रतिकूल असो, यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..