मोठी बातमी- भाडेवाढ न होता मिळणार AC लोकल?; मुख्यमंत्र्यांनी मास्टर प्लॅनच सांगितला!

 मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल प्रवासाबाबत मोठी घोषणा केली आहे. एसी ट्रेन भाडे न वाढवता देण्याचा सरकारचा विचार आहे. रेल्वेमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर सरकारचा भरआहे.मुंबई: मुंबईतील शहराजवळी मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी लोकल ट्रेनचा अपघात झाला. दोन लोकल गाड्यांच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसल्याने चार जणांना आपले प्राण गमावावे लागले. या दुर्घटनेनंतर सरकार दरबारी हालचाली वाढल्या असून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल प्रवासाबाबत मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे.

“एसी ट्रेन द्यायच्या आणि त्या भाडं न वाढवता द्यायचा, असा मास्टर प्लॅन सरकारकडे आहे. मेट्रोचे जाळे नसल्यामुळे लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. रेल्वे गाड्यांना दरवाजे बसवण्याचं काम सुरू आहे. लोकांना हवा खेळती राहावी यासाठी सरकार उपाययोजना करेल. लोकल गाड्यांमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल, हे सरकारला कळतं. तेवढं डिझाईन डोकं सरकारकडे आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “रेल्वेमंत्र्यांची असंवेदनशीलता, अशा आशयाची बातमी पाहिली. पण 9 जून रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव माझ्यासोबत अडीच तास बोलत होते.”शासकीय कार्यालयांना फ्लेक्सी वेळेचं बंधन दिलं आहे.

पण खाजगी कार्यालयांना ते लागू करताना अडचण येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्याचा सरकार प्रयत्न करेल, असेही फडणवीस म्हणाले.दरम्यान, मुंब्रा लोकल अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मात्र रेल्वेमंत्र्यांनी अजूनपर्यंत मृतांना श्रद्धांजली वाहिली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेल्वे मंत्रालयाने अपघाताची माहिती, उपाययोजना आणि मृतांना मदत याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे रेल्वेमंत्री अजूनही भावनाशून्य कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. अश्विनी वैष्णव सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. पण या दुर्घटनेवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..