लोकल प्रवासादरम्यान तीन वर्षातील मृतांचा आकडा हादरवणारा, मध्य रेल्वेवरील या सहा स्थानकात सर्वाधिक मृत्यू.

मुंबई लोकलच्या प्रवासात गेल्या तीन वर्षांत ७,५६० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ७,२९३ जण जखमी झाले आहेत. मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक अपघात झाले असून ठाणे-कल्याण दरम्यान मृतांची संख्या जास्त आहे. माहिती अधिकारानुसार, रेल्वे पोलिसांनी ही आकडेवारी उघड केली आहे.रेल्वे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामधील मृतांची आणि जखमींची संख्याही मोठी आहे. गेल्या तीन वर्षात मुंबई लोकलच्या प्रवासादरम्यान ७,५६० प्रवासी मृत्यूमुखी पडले, तर ७,२९३ जण जखमी झाले आहेत. गर्दीचे अयशस्वी नियोजन, मर्यादित लोकलफेऱ्या आणि थांबे, वातानुकूलित लोकलचा सामान्य लोकलवरील ताण, रुळांभोवती कुंपणाचा अभाव, यांमुळे अपघात घडत आहेत.

मध्य रेल्वेवर सर्वाधिक अपघाती मृत्यू ठाणे ते कल्याण या मार्गावर झाले आहेत. या मार्गावर झालेल्या अपघातांतील जखमींची संख्याही सर्वाधिक आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) माहिती अधिकारात दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली.सन २०२४ मध्ये मध्य रेल्वेवर धावत्या लोकलमधून पडून ३८७ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. ७८८ जण जखमी झाले. या कालावधीत कल्याण जीआरपीमध्ये धावत्या लोकलमधून पडून ११६ जणांचा मृत्यू, तर १५७ जण जखमी झाले. डोंबिवली जीआरपीमध्ये ३९ मृत्यू आणि ९६ जखमींची नोंद आहे.

ठाणे जीआरपीमध्ये ६८ मृत्यू आणि १०७ जण जखमी झाल्याची नोंद आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर हे प्रमाण सुमारे ५८ टक्के आहे.मध्य रेल्वेवर सन २०२२ मध्ये झालेल्या अपघातांत १,५८५ प्रवाशांचा मृत्यू आणि १,१५३ जण जखमी झाले. गेल्या वर्षी यामध्ये किरकोळ घट झाली. १,५३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे अपघातांतील जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सन २०२४ मध्ये १,६५५ प्रवासी जखमी झालेरुळ ओलांडणे, धावत्या रेल्वेतून पडणे, फलाट आणि रेल्वेच्या पोकळीत पडणे, आत्महत्या, हृदयविकाराचा झटका, विजेच्या धक्क्याने मृत्यू, आजारपण

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..