भीती… चिंता… अन् अश्रू; मुंब्रा लोकल अपघातानंतर नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी, मन हेलावणारा आक्रोश.

मुंब्र्यात घडलेल्या लोकल ट्रेन अपघातानंतर जखमींना तात्काळ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईत रुग्णालयात पोहोचले. यावेळी मन हेलावणारं दृष्य होतं.लोकलमधून पडून जखमी झालेल्या प्रवाशांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. अतिदक्षता कक्षाबाहेर बसलेल्या या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता स्पष्टपणे जाणवत होती. यातच एका जखमी व्यक्तीच्या पत्नीला रडू कोसळल्याने येथील वातावरण गंभीर बनले.मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून जखमी झालेल्या नऊ प्रवाशांना कळव्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दोघांना पुढील उपचारासाठी ज्युपीटर रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींबाबत माहिती मिळताच कळवा रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. जखमींवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असल्याने त्यांचे नातेवाईक या कक्षाबाहेर खाली बसून होते. हे सर्वजण चिंतेने व्याकुळ दिसत होते. कक्षातून उद्घोषणा होताच, त्यांच्या काळजात जणू धस्स होत होते.टिटवाळा, बल्याणी येथील तुषार भगत हा २२ वर्षांचा तरुण या घटनेत जखमी झाला आहे. तो ठाण्यातील माजिवडा परिसरात काम करतो. नेहमीप्रमाणे सकाळी तो लोकलने कामावर जाण्यास निघाला होता.

मुलगा जखमी असल्याचे कळताच त्याची आई आणि अन्य नातेवाईक तातडीने रुग्णालयात पोहोचले. अन्य एका जखमीच्या काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या आणि शांत बसलेल्या पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहण्यास सुरुवात होताच, अन्य जखमींच्या नातेवाईकांचे चेहरे भेदरल्यासारखे झाले. कळवा रुग्णालय परिसरात ठाणे पोलिसांनी बंदोबस्तही वाढवला होता.जखमी प्रवाशांना उपचारासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळवा रुग्णालय प्रशासनाने अगोदरच सज्जता केली होती. अधिकचा कर्मवारीवर्ग, सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर तयार होते. जखमींना रुग्णालयात आणल्यानंतर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिकेचे आयुक्त सौरभ राव रुग्णालयात आले होते. ते सर्व उपचार प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते.राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन,

भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत विचारपूस केली. या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तीन प्रवाशांचे मृतदेह सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले होते. कुटुंबातील अत्यंत जवळचा व्यक्ती गमावण्याच्या अतीव दु:खाने नातेवाईकांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबतच नव्हते. यातील एका महिलेने जोरात हंबरडा फोडल्याने उपस्थितीतांची मने हेलावली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..