हुंड्याच्या छळापायी आणखी एका विवाहितेने आयुष्य संपवलं, दुसऱ्या मजल्यावर गेली अन्… पुणे हादरलं!

पुण्यात आणखी एका विवाहितेने हुंड्याच्या छळापायी आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या विवाहितेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जात खाली उडी घेतली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.पुण्यात सासरच्या मंडळीच्या छळापायी काहीच दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे या विवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली होती. वैष्णवीसोबत ज्याप्रकारचा छळ आणि मानसिक जाच करण्यात आला त्याने संपूर्ण महाराष्ट्र संतापला होता. त्यानंतर आता पुण्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आपला जीव दिला आहे.पुण्याच्यावाघोली येथे हुंड्याच्या छळाला कंटाळून स्वाती सूरज पाठक (वय 23) या नवविवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तिने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी स्वातीच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी स्वातीचा पती सूरज पाठक (वय 26) याला अटक केली आहे. तसेच, सासू सुनिता पाठक (वय 45), दीर नीरज पाठक (वय 23), मामा अरुण उपाध्याय आणि अरविंद उपाध्याय यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, स्वाती आणि सूरज यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नात सूरजच्या कुटुंबीयांनी 5 लाख रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती. यापैकी 1 लाख रुपये आणि 7 तोळे सोने हुंडा म्हणून घेण्यात आले.

मात्र, मागणीप्रमाणे पूर्ण हुंडा न मिळाल्याने स्वातीला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती आणि सासूने गहाण ठेवून पैसे घेतले.हे दागिने सोडवण्यासाठी स्वातीच्या वडिलांकडे 3 ते 4 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. वडिलांनी 3 लाख रुपये दिले, तरीही स्वातीचा छळ थांबला नाही. घरगुती कारणांवरून वारंवार होणाऱ्या वादविवाद आणि मारहाणीमुळे ती कंटाळली होती. या सर्व छळाला वैतागून 7 जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वातीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. वाघोली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..