पोलिसांना खबर लागली अन् त्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर धाड, तिथे जे पाहिलं त्याने पोलीसह हादरले.

चंद्रपूरमध्ये पोलिसांनी केलेल्या धाडमध्ये कत्तलीसाठी कोंडलेल्या चाळीस जनावरांची सुटका करण्यात आली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात जनावरांच्या तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पोलीस विभागाकडून कार्यवाही होत असतानाही हा प्रकार सुरूच आहे. अशातच जनावरांना दुसऱ्या माळ्यावर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रामनगर पोलिसाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमे अंतर्गत चंद्रपूर शहरातील तुकूम तलाव परिसरात असणाऱ्या अब्दुल सलीम अब्दुल सत्तार याच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. गोडाऊन मधून सात गोवंश ताब्यात घेतल्या गेले. मोहम्मद साबीर ईस्माईल कुरेशी याच्या स्लॅबच्या घरातील दुसऱ्या माळ्यावर कत्तलीसाठी बांधून ठेवलेले २७ जनावरे तर शेख जलील शेख कादर याच्या घराजवळून सात गोवंशांची सुटका करण्यात आली.

चंद्रपूर येथे कत्तलीच्या उद्देशाने दुसऱ्या माळ्यावर चाळीस जनावरे कोंबून ठेवली होती. पोलिसांनी घरावर छापा टाकताच तेथील दृष्य बघून तेही संतापले. कोंबून ठेवलेल्या जणावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी अब्दुल सलीम अब्दुल सत्तार (४१) रा. उस्मानीया मस्जीद जवळ, तुकूम तलाव, मोहम्मद साबीर ईस्माईल कुरेशी (४५) रा. रहेमतनगर, हुद्दा मस्जीदजवळ, चंद्रपूर, शेख जलील शेख कादर (७०) रा. रहेमतनगर, चंद्रपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे.या कार्यवाहीतून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुटका केलेली सर्व जनावरे देखभालीसाठी प्यार फाउंडेशन, छोटा नागरपूर, पडोली येथे पाठविण्यात आली आहेत. ही कारवाई रामनगरचे पोलिस निरीक्षक असिफराजा शेख, एपीआय देवाजी नरोटे, एपीआय हनुमान उगले, मनीषा मोरे, आनंद खरात, जितेंद्र आकरे, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, सचिन गुरनुले, लालू यादव, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे आदींनी केली.कारवा रोड जंगल परिसरात काही इसम गोवंश जनावरांची हत्या करणार असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली.कारवा रोडवरील जंगल भागातील खुल्या जागेत ५१ गोवंश जनावरे बांधलेल्या स्थितीत पोलिसांना आढळून आलीत. जनावरांची पाहणी केली असता ४४ नग लहान-मोठ्या गायी, आठ महिने ते सहा वर्षापर्यंत ७ लहान-मोठे गोन्हे त्यात होते. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी मो. शाहीद कुरेशी, मकसूद कुरेशी, अब्दुल अंसार गफार, शेख बब्बू शरीफ, कलीम गणी कुरेशी, शहजाद हसन कुरेशी, यासीन मोहमद कुरेशी सर्व रा. बल्लारपूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..