फास्ट लोकलमधून 8 प्रवासी पडले, मध्य रेल्वेचे तातडीने 3 निर्णय, दुसरा मुद्दा वाचून जीव भांड्यात पडेल.

 मध्य रेल्वे मार्गावरील दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून आठ प्रवासी खाली पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरवाजावर उभे असलेले प्रवासी तोल जाऊन पडल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर मध्य रेल्वेचे मोठे निर्णय घेतले आहेत.मुंबई लोकलमधून दिवा आणि मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून आठ प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुष्पक एक्सप्रेसमधून हे प्रवासी खाली पडल्याची माहिती होती, पण असं काही झालेलं नाही. नेमकं काय घडलं याबद्दल मध्य रेल्वेचे सीपीआरओ अधिकारी स्वप्नील नीला यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

लोकलमधील काही लोक दरवाजाच्या फूट बोर्डावर होते. मुंब्रा आणि दिवा या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान एकमेकांना लागून पडलेली आहेत. हे सगळे प्रवासी फूट बोर्डवर होते, दोन्ही प्रवासी एकमेकांना लागल्यामुळे एकूण ८ प्रवासी पडले होते. ही घटना ९.३० च्या दरम्यान घडली असून ९.५० ला अॅम्बुलन्स दाखल झाल्या होत्या त्या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवीन गाड्या येणार आहेत त्या सर्व ऑटोमॅटिक डोर क्लोजेससोबत फिटमेंटने येणार आहेत. आयसीएफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलला रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती स्वप्नील नीला यांनी दिली.मध्ये रेल्वेने कल्याणपासून कसारापर्यंत आणि कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा विचार केला आहे. दादर, दिवापासून सीएसटीपर्यंत पाचव्या आणि सहाव्या लाइनची प्लॅनिंग केली आहे. ही लाइन कुर्लापर्यंत झाली असून पुढच्या कामासाठी जागा घेतली जात आहे. सीएसटीवरील सिग्लनची सिस्टिम अपग्रेड केली आहे. लोकलच्या २२ फेऱ्या चालतात त्या वाढवल्या जातील, अशी माहिती स्वप्नील नीला यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..