प्रगत शेतीची मोठी झेप – वसंत शिंदे राज्यात खरीप ज्वारीत प्रथम क्रमांक : ३५.४४ क्विंटल उत्पादनाची राज्यभर दखल; लहान वाघोद्याचे नाव उजळले.

खरीप ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक व आरोग्यास पोषक धान्य मानले जाते. यामध्ये फायबर, प्रथिने व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मधुमेह, हृदयरोग आणि पचनासाठी उपयुक्त अशा या धान्याला सध्या आरोग्यसंपन्न अन्न म्हणून मान्यता मिळत आहे. बदलत्या हवामानात टिकून राहणाऱ्या आणि कमी पाण्यावरही भरघोस उत्पादन देणाऱ्या या पिकाला शाश्वत शेतीत महत्त्वाची भूमिका आहे. अशा पार्श्वभूमीवर खरीप ज्वारी उत्पादनात मिळवलेले विक्रमी यश केवळ एक वैयक्तिक यश न राहता, आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक ठरते.नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील लहान वाघोदा गावचे प्रगतशील शेतकरी  वसंत भास्कर शिंदे (वाघोदा ” खु ” ता रावेर ) यांनी मेहनत, अभ्यासू वृत्ती आणि आधुनिक शेतीतंत्रज्ञानाच्या साहाय्याने खरीप ज्वारी उत्पादनात राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा ऐतिहासिक मान पटकावला आहे. त्यांनी ३५.४४ क्विंटल प्रति हेक्टर इतके उच्च उत्पादन घेतले असून “खरीप ज्यारी सर्वसाधारण गटात” राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल प्रथम स्थान मिळवले आहे.

वसंत शिंदे यांनी पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करत आधुनिक बियाणांची निवड, वेळेवर कीडनाशक व खते व्यवस्थापन, आणि यंत्रसामग्रीचा योग्य वापर करत हे यश संपादन केले. त्यांच्या या अपूर्व यशामुळे लहान वाघोद्याचे नाव संपूर्ण राज्यात उजळले आहे.शेतकरी वसंत शिंदे हे प्रगतिशील शेतकरी  पुंडलिक भास्कर शिंदे (चौधरी) यांचे धाकटे बंधू असून, वि. का. सेवा सहकारी सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना 1917) या तालुक्यातील आद्य सहकारी संस्थेचे उपसभापती म्हणून कार्यरत आहेत.या यशाबद्दल वि .का .से .सेसोसायटीचे थोरगव्हाण ता रावेर सभापती  मधुकर वसंत कोल्हे “, सोसायटीचे “सचिव श्री ज्ञानेश्वर पाटील “, तसेच सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.सहाय्यक कृषी अधिकारी  राजेंद्र कोंडे ” यांच्या मार्गदर्शनाखाली “२२ पीके सर्द” योजनेतून ज्वारी पीक निवडण्यात आले होते. या योजनेअंतर्गत वसंत शिंदे यांनी मिळवलेले यश विभागासाठीही अभिमानास्पद आहे.  कोंडे यांनी सांगितले की, “तेलबिया पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी गट बैठका घेऊन त्यांना दिशा व प्रेरणा देणार आहोत.”वसंत भास्कर शिंदे यांचे यश इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असून परिसरात नव्या आशा व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रगती , प्रेरणा खरीप ज्वारीच्या माध्यमातून बदल घडवणारा राज्यातील प्रथम क्रमांकाचा शेतकरी! म्हणून कृषी विभागाने सन्मान दिला मनस्वी आनंद अभिमान आहे शेतकायांनी अशा स्पर्धेत वेगवेगळया पिक स्पर्धेन सहभागी व्हावे . हा पुरस्कार राज्यातील सर्व शेतकायांचा आहे कृषी विभागातील सहकार्य करणारे मार्गदर्शक , वडील बंधु  पुंडलीक चौधरी यांचे मागदर्शन तसेच माझी पत्नी  कल्पना चौधरी यांचे सहकायाने मी इथपर्यंत पोहचू शकलो असे मत पुरस्कारार्थी वसंत भास्कर शिंदे (चौधरी ) यांनी मत व्यक्त केले .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..