पार्थ पवारांच्या निकटवर्तीयाचा संशयास्पद मृत्यू, राष्ट्रवादीच्या नेत्याची बॉडी बंद कारमध्ये आढळल्याने खळबळ.

ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सरचिटणीस असून पार्थ पवार यांचा विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात त्याची ओळख होती. त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले. त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय-३२ रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ, सोलापूर) या युवा नेत्याचा मृतदेह बंद कार मध्ये आढळून आला आहे.

रविवारी रात्री घरासमोरील कारमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने आत्महत्या का केली याचा तपास सोलापूर पोलिस करत आहे.राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सोलापुरातील युवा नेता ओंकार हजारे रविवारी दुपारी कारमध्ये बसला होता. त्यानंतर तो बाहेरच आला नाही. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता तो सीटवर निपचित पडला होता. कारचा दरवाजा तोडून बेशुद्धावस्थेत त्याला बाहेर काढले गेले. नातेवाईकांनी ताबडतोब ओंकारला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी ओंकार हजारेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सरचिटणीस असून पार्थ पवार यांचा विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात त्याची ओळख होती. त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले. त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त होत आहे.तर दुसरीकडे, कौटुंबिक वादातून पतीने गोळी झाडून पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वरळी येथे रविवारी (८ जून) घडली. राजमनोहर नामपिल्ले, वय 62 वर्षे, असे पतीचे नाव असून, लता, वय 58 वर्षे, हिच्या हत्येनंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजमनोहर यांचे मुलाशी वारंवार खटके उडत असत, यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं का, याचा शोध सुरु आहे. तसेच नामपिल्ले दाम्पत्य आर्थिक अडचणीत असल्याचीही चर्चा आहे. राजमनोहर यांचा मुलगा आवाज ऐकून खोलीबाहेर आला, त्यावेळी आई-वडील दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..