बेपत्ता हनिमून जोडपे केसमध्ये कल्पनेपलिकडचा ट्विस्ट, राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पत्नी सोनमला अटक.

सोनमने पती राजा रघुवंशी यांच्या हत्येची योजना आखून ती अमलात आणली. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह तीन हल्लेखोरांना अटक केली.मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या बेपत्ता जोडप्याच्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. जवळपास गेल्या 15 दिवसांपासून रघुवंशी जोडपं बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचे गूढ वाढत चालले होते. मात्र अखेर या प्रकरणाचा खळबळजनक खुलासा झाला आहे. कारण पती राजा रघुवंशी याची हत्या त्याची पत्नी सोनम हिनेच घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पत्नी Sonam Raghuvanshi आणि तिच्या तीन साथीदारांना उत्तर प्रदेशात अटक केली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या घटनेची माहिती दिली आहे.सोनमने पती राजा रघुवंशी यांच्या हत्येची योजना आखून ती अमलात आणली. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या घटनेची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.राजा आणि सोनम रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी मेघालय पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, तर महिलेने आत्मसमर्पण केले आहे. आणखी एका हल्लेखोराला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे, असे सांगण्यात आले आहे.राजा रघुवंशी आणि Sonam Raghuvanshi यांचे 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले होते. ते 20 मे रोजी हनीमूनसाठी मेघालयला गेले होते. सुरुवातीला दोघांशी संपर्क होत होता, मात्र नंतर संपर्क तुटला. राजाच्या मोठ्या भावाला वाटले की नेटवर्कचा इश्यू असेल, पण २४ मे पासून दोघांचे मोबाईल बंद झाले. त्यामुळे त्यांना चिंता वाटू लागली. सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन यांनी शिलॉन्ग गाठले आणि शोध पथकात सामील झाले.मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, “राजा रघुवंशी हत्याकांडात सात दिवसांच्या आत मेघालय पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मध्य प्रदेशमधील ३ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, महिलेनं सरेंडर केलं आहे आणि आणखी एका हल्लेखोराला पकडण्यासाठी ऑपरेशन अजूनही सुरू आहे.”पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका ढाब्यावर आत्मसमर्पण केले. या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.सोनमने पोलिसांना दिलेल्या जबाबात हत्येची कबुली दिली असून तिने हे कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर रघुवंशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..