संपूर्ण पिंडदान पूजा संपल्यानंतर कुटुंबीय बाघ नदीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी गेले. सर्वात आधी समिता टेंभरे नदीकाठच्या दगडावरुन घसरली.बाघ नदीच्या करोणी घाटावर पिंडदान करण्यासाठी आलेल्या नागपूर शहराजवळील हिंगणा येथील तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी गोंदिया तालुक्यातील रजेगावजवळ घडली. समिता शत्रुघ्न टेंभरे, वय 32 वर्ष, मीनाक्षी बघेले, वय 36 वर्ष, व मीराबाई इसुलाल तुरकर, वय 55 वर्ष, सर्व राहणार राजीवनगर (हिंगणा) अशी मृतांची नावे आहेत.
पिंडदान करण्यासाठी या तिन्ही महिला बाघ नदीच्या कोरणी घाटावर आल्या होत्या. पिंडदान करीत असताना समिता यांचा तोल गेल्याने नदीत कोसळल्या. त्यांना वाचविण्यासाठी मीनाक्षी आणि मीराबाईदेखील धावून आल्या. कुणालाही पोहता येत नसल्याने नदीच्या खोल पाण्यात तिघीही क्षणात बुडाल्या. काठावर असलेल्यांना हे दिसून येताच त्यांनी मदतीसाठी धावा केला.संपूर्ण पिंडदान पूजा संपल्यानंतर कुटुंबीय बाघ नदीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी गेले. सर्वात आधी समिता टेंभरे नदीकाठच्या दगडावरुन घसरली. हे पाहून आधी मीनाक्षी बघेले हिने तिला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली, मात्र ती देखील बुडू लागली.जेव्हा या दोघींना बुडताना पाहून 55 वर्षीय मीराबाई तुरकर यांना राहावले नाही, तेव्हा त्यांनीदेखील तिला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली, मात्र दुर्दैवाने काळाने तिघींवरही घाला घातला. पिंडदान विधी करताना तिघीही बुडाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.आपत्ती निवारण कक्षाला माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळ गाठले. शोध मोहिमेनंतर तिन्ही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रावणवाडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.









