नदीवर गेलेल्या तिघींवर काळाचा घाला, माय लेकीसह पुतणीचा करुण अंत; कुटुंबावर दु:खाचा डोंगर.

 कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या माय-लेकीसह पुतणीवर काळाने घाला घातला. नदीत पाय घसरून पडल्यानंतर एकमेकांना वाचवण्याच्या तिघीही मृत्यू पावल्या आहेत. शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे.कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या माय-लेकीसह पुतणीवर काळाने घाला घातला. नदीत पाय घसरून पडल्यानंतर एकमेकांना वाचवण्याच्या तिघीही मृत्यू पावल्या आहेत. शनिवारी दुपारी उमरी तालुक्यातील भायेगाव येथे ही दुर्देवी घटना घडली. मृतांमध्ये १२ आणि १४ वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

महानंदा भगवान हणमंते (वय ३५), पायल भगवान हणमंते (वय १४) आणि ऐश्वर्या लालू हणमंते (वय १२) अस मृतांची नावे आहेत. या तिघीही महागाव येथील रहिवासी आहेत. महानंदा हनमंते या नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या मुलीला आणि पुतणीसोबत घेऊन गावालागत असलेल्या गोदावरी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आधी महानंदा भगवान हनमंते हिला पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने ती पाण्यात पडली आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. तेव्हा काठावर उभे असलेल्या पायलने, आपली आई पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. तिच्यासह दोघेही बुडत असल्याचे पाहून ऐश्वर्याने ही देखील दोघींना पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिघींनाही पोहायला येत नसल्याने तिघींनी प्राण गमावले.एकमेकींचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्या बुडून मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. एकाच कुटुंबातील तीन मायलेकीचा नदीत बुडाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती देण्यात आली. गावातील नागरिकांच्या मदतीने पाण्यात बोटीवरून गळ टाकून तिघीजणींचेही प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले. पंचनामा नंतरच पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..