देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. काही राज्यांत सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशवासीयांच्या चिंतेत भर पडणार आहे.देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. काही राज्यांत सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशवासीयांच्या चिंतेत भर पडणार आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांत सक्रीय रुग्णांमध्ये भर पडली आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, हरियाणामध्ये एकून १०२ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. याआधीच्या दिवशी ८७ रुग्ण बाधित झाले होते. हरियाणाच्या गुरूग्राम जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुजरातमध्ये १८३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे सक्रीय रुग्णांचा आकडा आता ८२२ वर पोहोचला आहे.










