२००९ ते २०१४चा काळ संघर्षाचा; काँग्रेसचा नामोल्लेख टाळून मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका.

 उद्योग क्षेत्रासाठी, राजकीयदृष्ट्या आमच्या उद्योगांसाठी आणि संपूर्ण देशासाठी २००९ ते २०१४ हा अत्यंत संघर्षाचा काळ होता, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळून शनिवारी केली.‘उद्योग क्षेत्रासाठी, राजकीयदृष्ट्या आमच्या उद्योगांसाठी आणि संपूर्ण देशासाठी २००९ ते २०१४ हा अत्यंत संघर्षाचा काळ होता,’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळून शनिवारी केली. ‘अटल बिहारी वाजपेयी यांचे इथेनॉल धोरण या काळात मागे पडले,’ असेही ते म्हणाले.‘प्राज इंडस्ट्रिज’चे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांच्या ‘पैलतीरावरून…तर झालं असं’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

त्या वेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विश्वकर्मा पब्लिशिंगचे कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, ‘प्राज’चे अध्यक्ष अतुल मुळे आणि डॉ. चौधरी उपस्थित होते.‘इथेनॉल निर्मिती आणि वापरासंबंधीचा विचार तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांच्या काळात पुढे आला. प्रत्यक्ष काम सुरू व्हायला २०१४ साल उजाडले. दोन, पाच टक्के अशी वाटचाल करीत आता इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल वापरापर्यंत आपण पोहोचलो आहोत,’ असे डॉ. चौधरी यांनी सांगितले. हा धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी, ‘२००९ ते २०१४ हा काळ केवळ उद्योगांसाठी नव्हे, तर आमच्या उद्योगांसाठी आणि देशासाठी संघर्षाचा होता,’ अशी टीका केली.‘देशात २०१४ नंतर सत्ता बदलल्यानंतर इथेनॉलसंदर्भात निश्चित धोरण आले. ‘प्राज’सारख्या उद्योगांनी केलेल्या सूचना स्वीकारून केंद्र सरकारने धोरण बदलले. त्याचा परिणाम म्हणून इथेनॉल निर्मिती आता वीस टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे,’ असे फडणवीस म्हणाले.‘माझा साखर कारखाना नाही. मात्र, आपण साखर कारखानदारी करीत आहोत, असे मला आता वाटू लागले आहे, कारण गेली दहा वर्षे आम्ही केवळ साखर कारखान्यांचे प्रश्न सोडवत आहोत. मात्र, यामुळे साखर उद्योग भक्कमपणे उभा राहिला आहे,’ अशी मिश्कील टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘आपण पुस्तक प्रकाशनासाठी वाट वाकडी करून आलात,’ या डॉ. प्रमोद चौधरी यांच्या टिप्पणीवर फडणवीस यांनी, ‘वाकड्या वाटेने चालल्याचा अनुभव प्रत्येक राजकारणाला असतो,’ अशी हजरजबाबी प्रतिक्रिया देताच हशा पिकला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..