तेजस्वी यादव थोडक्यात बचावले; ताफ्यातील वाहनांना ट्रकची धडक, तीन सुरक्षा कर्मचारी जखमी.

बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील दोन वाहनांना भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत तीन पोलिस जखमी झाल्याची घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यात शनिवारी घडली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील दोन वाहनांना भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत तीन पोलिस जखमी झाल्याची घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यात शनिवारी घडली. या घटनेत तेजस्वी यादव थोडक्यात बचावले.

तेजस्वी यांचा ताफा मधेपुरा येथून पाटण्याला परतत असताना ही घटना घडली. हा ताफा पाटणा-मुझफ्फरपूर राष्ट्रीय महामार्गावर गोराउलजवळ चहासाठी थांबला असताना, मध्यरात्रीनंतर १२.३० वाजता हा अपघात झाला. ‘या अपघातात तेजस्वी यादव थोडक्यात बचावले. तीन सुरक्षारक्षक जखमी झाले असून, त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. यादव यांनी या रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली,’ असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.‘अपघातानंतर मी जिल्हा पोलिसांना, प्रशासनाला तात्काळ कळवले. हा अपघात माझ्या गाडीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर झाला. वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी,’ असे यादव यांनी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी ट्रकचालकासह त्याच्या मदतनीसाला अटक करून, ट्रक ताब्यात घेतला. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.तेजस्वी यांच्या सुरक्षेबाबत स्थानिक प्रशासनाने निष्काळजी केल्याचा आरोप तेजस्वी यांच्या भगिनी रोहिणी आचार्य यांनी ‘एक्स’वरून केला. ‘ताफ्याच्या मध्यभागी असलेल्या तेजस्वी यांच्या कारजवळ ट्रक कसा पोहोचला? तेजस्वी यांना धोका पोहोचवण्याचा हेतू होता का? तेजस्वीबाबत अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत,’ असे म्हणत त्यांनी चौकशीची मागणी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..