राज, उद्धव सोबत येणं काळाची गरज! कुटुंबाचा विरोध पत्करुन शिंदेसेनेत गेलेल्या नेत्याचं विधान.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरें सोबतचे मतभेद संपल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना परत एकत्र यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र, कीर्तीकरांना यावेळी निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले.मुंबई: गेल्या महिन्याभरापासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा जोरात सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एप्रिलच्या अखेरीस दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या मतभेदासंदर्भात बोलताना एक सकारात्मक विधान केलं. आमचे वाद, भांडणं महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर पुढच्या काही तासांत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली. आमच्यात वाद, मतभेद तसे नव्हतेच. काही असलेच, तर आज ते संपले. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या, अशी साद उद्धव यांनी घातली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठा आणि मनसेचे नेते संभाव्य युतीसंदर्भात सकारात्मक बोलत आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीला युतीच्या विरोधात सूर लावणाऱ्या मनसेच्या नेत्यांची भूमिका आता बदलली आहे. त्यांनी सकारात्मक विधानं सुरु केली आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेनं या सगळ्यावर सावध पवित्रा घेतला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नुकसान शिंदेसेनेचं होण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे कीर्तीकर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर सकारात्मक बोलले आहेत.’उद्धव आणि राज ठाकरे एकत्र यावेत ही इच्छा महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची आहे. बाळासाहेबांच्या हृयातीत त्यांनीही दोघांना सोबत आणण्याचा प्रयत्न कसोशीनं केला. बाळासाहेबांची कडवट, भव्यदिव्य शिवसेना या महाराष्ट्रात परत अवतरायची असेल तर एकनाथ शिंदेसुद्धा यांच्यासोबत आले पाहिजेत, असं माझं प्रामाणिक मत आहे,’ असं कीर्तीकर म्हणाले.शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ४० आमदारांनी शिंदेंना साथ दिली. त्यानंतर बहुतांश खासदारदेखील शिंदेसोबत गेले. कीर्तीकर सर्वात उशिरा शिंदेसेनेत दाखल झाले. पक्षफुटीनंतर ते ठाकरेंच्या काही कार्यक्रमांना, मेळाव्यांना उपस्थित होते. पण अखेर त्यांनी शिंदेसेनेची वाट धरली. विशेष म्हणजे त्यांचं कुटुंब ठाकरेंसोबत कायम राहिलं. आपण कुटुंबाच्या विरोधात जाऊन पक्षांतराचा निर्णय घेतल्याचं कीर्तीकर यांनी सांगितलं होतं. शिंदेसेनेत गेलेल्या कीर्तीकर यांचं तिकीट पक्षानं कापलं. त्यांच्या जागी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या रविंद्र वायकरांना संधी दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..