पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद, रिक्षा चालकाने डीएड परीक्षार्थीला संपवलं, संयशित आरोपी गजाआड.

छत्रपतीसंभाजी नगरात एका रिक्षाचालकाने डीएड परीक्षार्थीवर चाकू हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.छत्रपती संभाजीनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. शहरात डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थी व रिक्षा चालक यांच्यात भाडे देण्यावरुन वाद झाला.वादाचं परिवर्तन हाणामारीत झाले. मारहाणीत चालकाने पसेंजरच्या पोटात चाकू भोसकून खून केला.ही घटना शहरातील नगर नाका येथील इन्कम टॅक्स कार्यालया जवळ घडली.मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. जयराम बबन पिंपळे वय २८ रा.श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे मयत परीक्षार्थीचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेचा तपास करून एका संशियत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी एक डी.एडचा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी वाळुंज येथे जात असताना बाबा पेट्रोलपंप येते रिक्षेत बसला. त्यानंतर दोघांमध्ये भाड्यासंबंधी वाद निर्माण झाला. त्यानंतर त्या दोघांमध्ये मारहाण झाली. त्या दरम्यान रिक्षाचालकान पॅसेंजरवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला. त्या अवस्थेतच त्याने रिक्षेची चावी काढली आणि बाबा पेट्रोलपंपापर्यंत पळत गेला. तेथून त्याने रिक्षा पकडली आणि स्वत:हून रुग्णालयात दाखल झाला. सदर विद्यार्थी हा डीएड परीक्षेसाठी अहिल्यानगर येथून छत्रपती संभाजीनगर येथे आला होता. त्याचे परीक्षा केंद्र वाळुंज येथे असल्याने तो तेथे जात होता.आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीच्या अटकेसंबंधी माहिती देताना सांगितले की, आयकर कार्यालयाच्या येथील कॅमेऱ्यात अतिशय धुरकट 4 क्रमांक पाहता येतो. आरटीओ विभागाकडून आम्ही सिरीज प्राप्त करुन घेतली. रिक्षाचा मेक बघितला, त्यासोबतच वाहतूक शाखेची मदत घेतली. तसेच सदर रिक्षावर यापूर्वी चलन आहे का? त्यात फोटो पाहिले. क्रमांकांची पडताळणी केली आणि सदर संशयित आरोपी सापडला असून त्याच्यासंबंधी पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.आज उपचाराधीन असणाऱ्या जखमी परीक्षार्थीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..