आरोपीचे शब्द ऐकून पोलीस थक्क; साहेब मी कोल्हापूरातून आलोय आणि माझ्या पत्नीचा…

सोलापूरमध्ये एका व्यक्तीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. त्याने कोल्हापूरमध्ये पत्नीचा खून केल्याचे सांगितले. सचिन राजपूत नावाच्या व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केली. त्याने स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला. सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी सात वाजता एक व्यक्ती आला अन् सांगू लागला मी कोल्हापूरातून आलोय. माझ्या पत्नीचा खून केला आहे. हे वाक्य ऐकून सोलापूर पोलीस थक्क झाले. त्याच्याकडून सविस्तर हकीकत ऐकून घेतली. सोलापूर पोलिसांनी ताबडतोब कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून आलेल्या व्यक्तीचा ताब्यात दिला. सचिन चंद्रशेखर राजपूत (वय ३४, रा. कालबिलागी, ता. जमखंडी, राज्य कर्नाटक) याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शुभांगीचा (वय २८, रा. कालबिलागी, ता. जमखंडी, बागलकट) खून केल्याची माहिती समोर आली आहे.

सचिन राजपूत याने सोलापूर पोलिसांना शुक्रवारी सकाळी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे येऊन हकीकत सांगितली. मी कोल्हापूर येथून आलो असून मी माझ्या पत्नीवर चाकूने वार करून तिला ठार केले आहे. कोल्हापूर परिसरातील जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जनस्थळी चाकूने वार करून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केले. संशयीत आरोपी पतीने शुक्रवारी सकाळी ७ वाजता सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठत खुनाची हकिकत सांगितली. सोलापूर पोलिसांनी आरोपी पतीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.संशयीत आरोपी सचिन हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद येथे भारतीय सैन्यदलात ८ वर्षे नोकरीस होता. त्याने एका महिलेसोबत अश्लील वर्तन केलेच्या कारणावरून त्याला सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता मोटारसायकलवरून सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आला आणि खून केल्याची माहिती दिली. फौजदार चावडी पोलिसांनी ताबडतोब कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून विचारणा केली. शुभांगी आणि सचिन दोघे जण गप्पा मारत बसले होते. यावेळी शुभांगी बेसावध असताना सचिनने शुभांगीच्या चेहरा, गळा व पोटावर चाकूने वार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.सोलापूर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पोलिसांना संपर्क साधून खुनाबाबत माहिती दिली. शिरोली पोलिसांनी संपूर्ण कासारवाडी डोंगर पालथा घातला. पण मृतदेह सापडला नाही. सचिन घटनास्थळावरील वर्णन सांगितल्यावर मृतदेह अखेर सापडला. सोलापूर पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली आणि शुभांगीचा मृतदेह सापडला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.